पिंपरी चिंचवड : बौद्धनगर एमआयडीसी (MIDC) मध्ये नदी लगतचा भागात सुरक्षा भिंत बांधून द्या, अशी मागणी असंघटित कामगार काँग्रेस शहराध्यक्ष सुंदर कांबळे यांनी सहाय्यक आयुक्त झोपडपट्टी निर्मूलन पुनर्वसन विभाग यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, बौद्धनगर MIDC या भागात गेली अनेक वर्षापासून नागरीक वास्तव्यास आहेत. परंतु दर वर्षी पावसाळ्यामध्ये सर्व नागरीकांच्या घरांमध्ये पाणी शिरते, यामध्ये नागरिकांचे खूप हाल होतात. अनेकांचे संसार देखील या पाण्यामध्ये वाहून गेलेले आहेत. तसेच घरोमध्ये पाणी शिरल्यामुळे लहान मुलांची खाण्याची आबाळ होते. या नागरिकांना राहण्यासाठी इतरत्र पळावे लागते.
त्यामुळे नागरिकांचा संवेदनशील पणे विचार करावा. व सुरक्षेच्या दृष्टीने नदी लगत सुरक्षा भिंत लवकरात लवकर बांधुन द्यावी जेणे करून या पावसाळ्यात येथील नागरीकांचे हाल होणार नाहीत.
– क्रांतिकुमार कडुलकर
तीन चाकी रिक्षावरील नवीन अन्यायकारक दंड रद्द न केल्यास महाराष्ट्रभर आंदोलन : बाबा कांबळे
स्वच्छ सर्वेक्षण एक भुलभुलैया, फसवणूक सुरू असल्याचा आरोप
१० पास विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी : स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) मार्फत 3603+ जागांसाठी मेगा भरती