पिंपरी चिंचवड / क्रांतिकुमार कडुलकर : मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्मचे हे शेवटेचे बजेट देशातील बहुतांश सर्व सामान्य, गोरगरीब व मध्यम वर्गीय जनतेची तसेच समस्त शेतकरी बांधवांची घोर निराशा करणारे बजेट आहे असेच म्हणावं लागेल. अर्थमंत्री निर्मला सितारमन यांनी आज सादर केलेल्या बजेट मध्ये कृषिप्रधान असणारया देशात शेती क्षेत्रासाठी सर्वात कमी तरतुद केली आहे. भाजपा सरकारच्या गेल्या नऊ वर्षात भांडवलशाही धार्जिण आर्थिक धोरणे राबवली जात आहेत, अशी टिका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे नेते इम्रान शेख यांनी केली आहे.
इम्रान शेख म्हणाले, परिणामी प्रत्येक बजेट मध्ये देशातील सर्वात मोठ्ठे रोजगार निर्मिती करण्याची क्षमता असणारे शेती क्षेत्राकडे भांडवलदार धार्जिण आर्थिक धोरणे राबविणारया भाजपा सरकार कडून अगदी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे असं म्हंटलं तर वावगं ठरणार नाही. आज सादर केलेल्या बजेट मध्ये देशातील वाढती बेरोजगारी दूर करण्यासाठी केंद्र सरकार आगामी काळात नेमकी काय पावलं उचलणार आहे किंवा भविष्यात बेरोजगार युवकांसाठी नेमकी किती आर्थिक तरतूद केली आहे. ह्या गोष्टी अजिबातच पहावयास मिळत नाहीत.
सरतेशेवटी फक्त इतकेच सांगेन की भाजपा सरकारच्या गेल्या नऊ वर्षातील चुकीच्या आर्थिक धोरणांमुळे देश आर्थिक दृष्ट्या उध्वस्त होत असताना आगामी लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून आकडे फुगवून सादर केलेले मृगजळासारखे फसवे बजेट आज सादर करण्यात आले आहे, असेही शेख म्हणाले.
