Sunday, September 8, 2024
Homeताज्या बातम्याBudget : मोदी सरकारकडून चंद्राबाबू आणि नितीशकुमार यांना मोठं गिफ्ट

Budget : मोदी सरकारकडून चंद्राबाबू आणि नितीशकुमार यांना मोठं गिफ्ट

Budget : एनडीए सरकार स्थापन झाल्यानंतर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 23 जुलै रोजी सरकारचा पहिला अर्थसंकल्प संसदेत सादर केला. या अर्थसंकल्पात बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांना मोठं गिफ्ट मिळालं आहे. दोन्ही राज्यांसाठी अर्थसंकल्पात भरीव तरतूद करण्यात आली आहे, ज्यामुळे पायाभूत सुविधांच्या विकासावर भर देण्यात आला आहे. (Budget)

आंध्रप्रदेशला 15 हजार कोटींची अतिरिक्त तरतूद (Budget)

आंध्रप्रदेशसाठी अर्थसंकल्पात 15 हजार कोटी रुपयांची अतिरिक्त तरतूद करण्यात आली आहे. पोलावरम सिंचन योजना पूर्ण करण्याची ग्वाहीही अर्थसंकल्पातून चंद्राबाबू नायडू यांना देण्यात आली आहे, ज्यामुळे राज्यातील कृषी आणि पाणी पुरवठा व्यवस्थेत सुधारणा होईल.

बिहारसाठी 26 हजार कोटींची भरीव तरतूद

बिहारमध्ये पायाभूत सुविधांच्या विकासासाठी 26 हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यात पटना-पूर्णिया एक्सप्रेसवे, बक्सर-भागलपूर राजमार्ग, बुद्धगया – राजगीर – वैशाली – दरभंगा आणि बक्सरमध्ये गंगा नदीवर पूल बांधण्याची घोषणा करण्यात आली आहे. तसेच, बिहारमध्ये नवीन मेडिकल कॉलेज आणि ऊर्जा प्रकल्प स्थापन करण्यासाठीही विशेष तरतूद करण्यात आली आहे. पिरपेंटी येथे 2400 मेगावॉटचा नवीन प्रकल्प उभारला जाणार आहे.

नवीन रोजगार योजनांची घोषणा

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी देशातील रोजगार वाढवण्यासाठी महत्त्वपूर्ण योजनांची घोषणा केली आहे. संघटित क्षेत्रात प्रथमच कामाला लागणाऱ्या तरुणांना प्रोत्साहनपर भत्ता मिळणार आहे. याचे बँक खात्यात तीन टप्प्यांत थेट पैसे जमा केले जातील. या योजनेनुसार नवीन नोकरदारांना 15 हजारापर्यंतचा प्रोत्साहनपर भत्ता म्हणजेच Incentive मिळेल, परंतु महिन्याला 1 लाख पेक्षा कमी वेतन असणारे नोकरदार या योजनेसाठी पात्र असतील. हे पैसे EPFO खात्यात जमा होतील.

कृषी क्षेत्रासाठी मोठ्या घोषणा

कृषी क्षेत्रात नैसर्गिक शेतीला प्राधान्य देण्यात येणार आहे. शेती उत्पादन वाढवण्यासाठी डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर पुरवलं जाईल, ज्यामुळे शेतीपिकांंचं सर्वेक्षण, मातीची तपासणी अशा सर्व गोष्टींची माहिती शेतकऱ्यांना दिली जाईल. यामुळे शेतीत अधिक उत्पादकता वाढेल आणि शेतकऱ्यांच्या उत्पन्नात सुधारणा होईल.

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

ब्रेकिंग : अजिंक्य नाईक यांची मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी निवड

मोठी बातमी : अर्थसंकल्पात सोने-चांदीच्या दरात मोठी कपात, वाचा किती झाले कमी !

मोठी बातमी : मनोज जरांगे पाटील यांच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी

ब्रेकिंग : मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय

मोठी बातमी : MPSC मार्फत सहयोगी प्राध्यापकासह विविध पदांसाठी मुलाखत

मोठी बातमी : संसदेत केंद्रीय अर्थसंकल्प सादर, वाचा अर्थसंकल्पातील मोठ्या घोषणा !

ब्रेकिंग : अर्थसंकल्पानंतर शेअर मार्केटमध्ये मोठी पडझड

गुजरातमधील शाळेच्या पहिल्या मजल्यावरील भिंत कोसळली, धक्कादायक व्हिडिओ समोर

नागपूरसह विदर्भात अतिवृष्टी; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून परिस्थितीचा आढावा

संबंधित लेख

लोकप्रिय