Tuesday, February 4, 2025

Budget 2025 : अर्थसंकल्प म्हणजे थोडी खुशी थोडा गम अशा स्वरूपाचा आहे – बाबा कांबळे

पिंपरी चिंचवड – केंद्र सरकारने आज मांडलेला अर्थसंकल्प म्हणजे थोडी खुशी थोडा गम अशा स्वरूपाचा आहे. अर्थसंकल्पामध्ये मध्यम वर्गाला कर आकरणीत मोठा दिलासा दिला आहे.(Budget 2025)

मात्र वाहतुकदारांसाठी घोषणा केलेला निर्णय झाला नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील 25 कोटी वाहतूकदारांसाठी ड्रायव्हर भवन उभारण्याचा निर्णय घेतला होता. त्याबाबत उल्लेख करण्यात आलेला नाही.

तसेच देशभरातील रिक्षा चालक, ऑटो टॅक्सी ड्रायव्हर यांसाठी सामाजिक सुरक्षा वेलफेअर बोर्ड बद्दल कोणतीही तरतूद करण्यात आलेली नाही. देशातील 45 कोटी असंघटित कामगार कष्टकऱ्यांना सामाजिक सुरक्षा वेतन बाबत तरतूद करण्यात आलेली नाही. सरकारने काही निर्णय चांगले घेतले आहेत. (Budget 2025)

इलेक्ट्रॉनिक वाहन स्वस्त करण्याचा निर्णय वाहतूक उद्योगाला चालना देणारा आहे. त्याचबरोबर मध्यम वर्गांना फायदा मिळणार आहे. कर भरण्यासाठी टप्पे केल्याने सोयीचा निर्णय आहे.

ऑनलाईन गिग वर्कर्ससाठी ओळखपत्र तयार करून त्यांना ई श्रम पोर्टलवर नोंदणी करण्याचा निर्णय महत्वाचा असून सुमारे 1 कोटी गिगवर्कर्सना पीएम जन आरोग्य योजनेअंतर्गत आरोग्य सेवा पुरवण्यात येणार आहे. हा देखील निर्णय चांगला आहे.

बाबा कांबळे, अध्यक्ष, कष्टकरी कामगार पंचायत.

Related Articles

- Advertisement -

Latest Articles