Friday, March 29, 2024
HomeNews"गगन दमामा बाज्यो "या नाटकाची महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ नाट्य स्पर्धेत ...

“गगन दमामा बाज्यो “या नाटकाची महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ नाट्य स्पर्धेत चमकदार कामगिरी !

कोल्हापूर : शहीद भगतसिंग यांच्या आयुष्यावर आधारित असणाऱ्या “गगन दमामा बाज्यो “या नाटकाची महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ आयोजित 68 व्या पुणे विभागीय प्राथमिक राज्य नाट्य महोत्सव 2022 23 मध्ये प्रथम क्रमांकाच्या 4 पुरस्कारांसह अंतिम फेरीत दाखल होण्याची धडाकेबाज कामगिरी केली आहे.यामध्ये सांघिक ,दिग्दर्शन, पार्श्वसंगीत , पुरुष अभिनय या श्रेणीमध्ये अव्वल स्थान मिळवले .

“गगन दमामा बाज्यो” या शहीद भगतसिंग यांच्या जीवनावर आधारित नाटकाला हा पुरस्कार प्राप्त झाला. यानिमित्ताने सर्व रंगकर्मीं,रसिक प्रेक्षक,सहकलाकार यांनी त्यांचे अभिनंदन केले .काफीला या कोल्हापूर मध्ये कार्यरत असणाऱ्या नाट्य संस्थेने सदर प्रयोग साकारला. या प्रयोगामध्ये उपस्थित असणारे सर्वच कलाकारांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर विजयश्री खेचून आणली आहे. या नाटकाचे महाराष्ट्रभर प्रयोग झाले आहेत. प्रयोगासाठी संपर्क सतीश तांदळे +91 98815 75049

संबंधित लेख

 


- Advertisment -

लोकप्रिय