Saturday, April 20, 2024
Homeराज्यब्रेकींग : उद्या १२ वीचा निकाल, असा पहा !

ब्रेकींग : उद्या १२ वीचा निकाल, असा पहा !

मुंबई  / रफिक शेख : विद्यार्थांची १२ वीच्या निकालाकडे लक्ष लागले असून सर्वोच्च न्यायालयाने देशातील सर्व राज्यांच्या शिक्षण मंडळांना ३१ जुलै पर्यंत बारावीच्या परीक्षांचे निकाल जाहीर करण्याचा आदेश दिला होता. आता महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा बारावीचा निकाल उद्या जाहीर होणार आहे. याबाबत शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ट्वीट करून अधिकृत माहिती दिली आहे.

राज्यातील बारावीच्या विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनाचा आराखडा शिक्षण विभागाने अखेर जाहीर केला असून मूल्यमापनासाठी विद्यार्थ्यांचे दहावी, अकरावीतील गुण आणि बारावीच्या वर्षांतील कामगिरी ग्राह्य धरण्यात येणार. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे राज्यमंडळाला अवघ्या २८ दिवसांत निकालाची प्रक्रिया पूर्ण करण्याची सूचना देण्यात आली होती.

विद्यार्थ्यांना महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक बोर्डाकडून घेण्यात आलेल्या १२ वीच्या निकालाचीही उत्सुकता होती. जुलै अखेर इयत्ता १२ वी निकाल लागेल असा म्हटले गेले होते. पण राज्यात अनेक ठिकाणी पूर आल्याने अनेक कामे थांबली आहेत. यामुळे मंगळावरी ३ ऑगस्ट रोजी हा निकाल जाहीर करण्यात येणार आहे.

असे असणार निकालाचे सूत्र बारावीचा निकाल जाहीर करताना ३० + ३० + ४० असे सूत्र निश्चित करण्यात आले आहे. त्यानुसार दहावीच्या परीक्षेत सर्वोत्तम गुण मिळालेल्या तीन विषयांतील गुणांच्या आधारे ३० टक्के गुण देण्यात येतील. अकरावीच्या अंतिम परीक्षेच्या आधारे ३० टक्के गुण देण्यात येतील. तर बारावीच्या वर्षांत शाळांनी घेतलेल्या चाचण्या, सराव परीक्षा, सत्र परीक्षा, प्रात्यक्षिक यांच्याआधारे ४० टक्के गुण देण्यात येणार आहेत. 

विषयनिहाय संपादित केलेले गुण खालील संकेतस्थळांवरुन उपलब्ध होतील व सदर माहितीची प्रत ( प्रिंट ) घेता येईल. अधिकृत संकेतस्थळांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे. 

१.https://hscresult.11thadmission.org.in

२. https://msbshse.co.in 

3. hscresult.mkcl.org 

4. mahresult.nic.in.

https://msbshse.co.in या संकेतस्थळावर विदयार्थ्यांच्या निकालाशिवाय निकालाबाबतची इतर सांख्यिकीय माहिती उपलब्ध होईल. तसेच www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर उच्च माध्यमिक शाळा / कनिष्ठ महाविद्यालयांना एकत्रित निकाल उपलब्ध होईल.

अधिक वाचा : 

ब्रेकिंग : लॉकडाउन संदर्भात राज्य सरकारची नवी नियमावली, या जिल्ह्यांना मोठी सूट देण्यात आली


संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय