Saturday, October 5, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडBreaking news : पिंपरी, चिंचवड व भोसरी विधानसभेवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित...

Breaking news : पिंपरी, चिंचवड व भोसरी विधानसभेवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचा दावा

मध्यवर्ती कार्यालयात बहुमताने ठराव पारित… अजित पवार यांच्याकडे केली मागणी (Breaking news)


पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : पिंपरी चिंचवड शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या मासिक बैठकीमध्ये रविवार दिनांक २२ सप्टेंबर २०२४ रोजी आमदार आण्णा बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली शहर कार्यकारिणीची मासिक बैठक मध्यवर्ती पक्ष कार्यालय, खराळवाडी पिंपरी येथे आयोजित करण्यात आली होती. (Breaking news)

सदर बैठकीमध्ये आगामी विधानसभा निवडणुकीसाठी शहरातील तीनही मतदार संघ येतात त्यापैकी पिंपरी विधानसभा हा राष्ट्रवादीच्या कोट्यातील अधिकृत उमेदवार संघ आहे तो पक्षाच्या वतीने महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच लढणार आहे. त्या व्यतिरिक्त भोसरी व चिंचवड विधानसभेमध्ये देखील राष्ट्रवादी पक्षाची फार मोठी ताकद आहे.


त्यामुळे दोन्ही मतदारसंघ चिंचवड व भोसरी विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळाव्या असा ठराव पक्षाच्या मासिक सभेमध्ये शहर कार्याध्यक्ष फजल शेख यांनी मांडला त्या ठरावाला महिला अध्यक्षा कविता आल्हाट यांनी अनुमोदन दिले आहे.

यावेळी आमदार आण्णा बनसोडे, जेष्ठ नेते भाऊसाहेब भोईर, माजी महापौर मंगला कदम, शहर कार्याध्यक्ष फजल शेख, महिला अध्यक्षा प्रा.कविता आल्हाट, युवक अध्यक्ष शेखर काटे, विद्यार्थी अध्यक्ष चेतन दुधाळ, ओबीसी अध्यक्ष विजय लोखंडे, माजी नगरसेवक सतीश दरेकर, संतोष बारणे, राजेंद्र जगताप, ज्ञानेश्वर कांबळे, गोरक्षनाथ पाषाणकर, निलेश पांढरकर, बन्सी पारडे, वरिष्ठ महिला कार्याध्यक्ष कविता खराडे, सामाजिक न्याय विभाग अध्यक्ष संजय औसरमल, सेवादल अध्यक्ष महेश झपके, सचिन औटे, सहकार सेल अध्यक्ष श्रीधर वाल्हेकर, असंघटीत कामगार सेल अध्यक्ष रविंद्र ओव्हाळ, उद्योग व व्यापार सेल अध्यक्ष श्रीकांत कदम, आदिवासी सेल अध्यक्ष विष्णू शेळके, युवक पिंपरी विधानसभा अध्यक्ष अक्षय माछरे, वाहतूक सेल अध्यक्ष विनोद वरखडे, व्हीजेएनटी अध्यक्ष राजू लोखंडे,लिगल सेल अध्यक्ष संजय दातीर, ग्राहक कल्याण सेल अध्यक्षा पल्लवी पांढरे, लता ओव्हाळ, महिला कार्याध्यक्ष उज्वला ढोरे, चिंचवड विधानसभा महिला अध्यक्षा संगीता कोकणे, मिरा कदम, उपाध्यक्ष विजय दळवी, तुकाराम बजबळकर, अरूण पवार, गोरोबा गुजर, रविंद्र सोनवणे, हर्षल मोरे, बाळासाहेब पिल्लेवार, राजीव क्षीरसागर, राजेंद्रसिंग वालिया, सरचिटणीस राजू चांदणे, अविनाश शेरेकर, स्वराज शिंदे, महेश माने, कुमार कांबळे, विजया काटे, यश बोध, रामकिसन माने, मिरा कांबळे, विनय शिंदे, जयश्री लांडगे, रमेश कांबळे, आशिष कांबळे, विक्रम पवार, रशिद सय्यद, ॲड शंकर पल्ले, विजय पांढारकर, दिलीप सरवदे, निलम कदम, देवी थोरात, सचिन वाल्हेकर, क्षमा सय्यद, सुजाता पांडे, राकेश गुरव, महेश ताकवणे, करण वाघ, सुनिल आडागळे, कार्यालयीन संपर्क प्रमुख धनाजी तांबे इत्यादींसह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

पुणे महापालिकेचा टेम्पो खड्ड्यात कोसळला; पहा थरारक व्हिडिओ

उत्तर प्रदेशात भरधाव बस पलटी; 44 प्रवासी जखमी, एका व्यक्तीचा मृत्यू, पहा व्हिडीओ

भयानक : पुण्यात मध्यरात्री घरात घुसून अज्ञातांकडून धारदार शस्त्राने युवकाचा खून

धक्कादायक : दुचाकी चोरीच्या संशयावरून जमावाकडून तिघांवर हल्ला; एकाचा मृत्यू

मोठी बातमी : संपूर्ण देशात बुलडोझर कारवाईला सर्वोच्च न्यायालयाची बंदी, न्यायालयाचे कठोर आदेश

SEXTORTION : एक मोठा सापळा : सौंदर्याचे मृगजळ-वो बोलती है, बुलाती है- ब्लॅकमेलिंग होत आहे का?

आयकर विभागात मोठी भरती; पात्रता फक्त 10वी पास

संबंधित लेख

लोकप्रिय