मुंबई : संभाजी भिडे यांच्या वादग्रस्त वक्तव्यावरुन सभागृहात चर्चा सुरू होती.आमदार नितेश राणे लक्षवेधी मांडत असताना सपाचे आमदार अबू आझमी आणि आ. रइस शेख यांनी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला.
भाजप आणि शिवसेनेचे आमदार आक्रमक झाले. वंदे मातरमच्या घोषणा देत होते. एकूण सभागृहात कायदा सुव्यवस्था मुद्द्यावर चर्चा सुरू होती. मात्र भोसरी विधानसभेचे आमदार लांडगे प्रश्न उपस्थित करीत असताना अबू आझमी यांनी ”शिवाजी महाराज की जय” अशी घोषणा दिली.
त्यावर संतप्त होऊन लांडगे यांनी ”… ये अबु आझमी छत्रपती शिवाजी महाराज यांना मानतो, मग औरंगजेबाचे उदात्तीकरण कशासाठी करतो.” अशा शब्दांत भाजपाचे आमदार महेश लांडगे यांनी भर सभागृहात समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमी यांना कठोर भाषेत सुनावले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मध्यस्थी करुन सभागृह शांत केले.