नवी दिल्ली : भारतीय नौदलाच्या आठ माजी जवानांना कतारच्या न्यायालयाने हेरगिरीच्या आरोपावरून फाशीची शिक्षा सुनावली आहे. प्रमुख भारतीय युद्धनौकांचे कमांडिंग अधिकाऱ्यांसह आठ जण डहरा ग्लोबल टेक्नॉलॉजीज अँड कन्सल्टन्सी सर्व्हिसेससाठी काम करत होते. जवान पूर्वी भारतीय नौदलात सेवा बजावत होते.
माजी नौदल अधिकाऱ्यात कॅप्टन नवतेज सिंह गिल, कॅप्टन बीरेंद्र कुमार वर्मा, कॅप्टन सौरभ वशिष्ठ, कमांडर अमित नागपाल, कमांडर पुरेनेंदू तिवारी, कमांडर सुगुनकर पाकला, कमांडर संजीव गुप्ता आमि नाविक रागेश यांना कतारच्या गुप्तहेरांनी 30 ऑगस्ट 2022 रोजी दोहा येथून अटक केली होती. आठ वेळा त्यांचा जामिन फेटाळण्यात आला आहे. त्यांच्यावर इस्रायलसाठी हेरगिरी केल्याचा आरोप होता.
कतार हा पॅलेस्टाईन समर्थक देश असला तरी भारताचे कतार सोबत मजबूत संबंध आहेत, फाशीच्या शिक्षेच्या निर्णयामुळे आम्हाला खूप धक्का बसला आहे आणि आम्ही सविस्तर निकालाची वाट पाहत आहोत. आम्ही कुटुंबातील सदस्य संपर्कात आहोत आणि आम्ही सर्व कायदेशीर पर्यायांचा शोध घेत आहोत, असे भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने (MEA) अधिकृत निवेदनात म्हटले आहे.