Friday, October 18, 2024
Homeआंतरराष्ट्रीयBreaking : पापुआ न्यू गिनीमध्ये भूस्खलन; संपूर्ण गाव गडप, ३०० ठार

Breaking : पापुआ न्यू गिनीमध्ये भूस्खलन; संपूर्ण गाव गडप, ३०० ठार

मेलबर्न : प्रशांत महासागराच्या दक्षिणेकडील भागात वसलेल्या पापुआ न्यू गिनीच्या दुर्गम भागात शुक्रवारी डोंगर कोसळून झालेल्या भूस्खलनात ३०० हून अधिक जण मृत्यूमुखी पडले आहेत. ११०० हून जास्त घरे गाडली गेल्याची भीती व्यक्त होत आहे. (Papua New Guinea Landslide)

स्थानिक माध्यमांनी आणि ऑस्ट्रेलियन ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशनच्या (ABC) वृत्त समूहाने दिलेल्या वृत्तानुसार राजधानी पोर्ट मोरेस्बीच्या वायव्येस सुमारे ६०० किलोमीटर अंतरावरील एंगा प्रांतातील काओकलम गावात शुक्रवारी पहाटे ३ वाजेच्या सुमारास भूस्खलन झाले. Land slide

मोठ-मोठे दगड, उन्मळून पडलेली झाडे अशी दृश्य दिसत आहेत. लोक मातीच्या ढिगाऱ्यांखाली आपल्या नातेवाईकांना शोधत आहेत. अनेक महिला आक्रोश करत आहेत. दरड कोसळल्याने महामार्गावर जाण्याचा मार्ग बंद झाला असून देशाचे पंतप्रधान जेम्स मारापे यांनी आपत्ती अधिकारी, संरक्षण दल, बांधकाम, महामार्ग विभाग हेलिकॉप्टरद्वारे मदत आणि घटनास्थळी बचावकार्य करत असल्याची माहिती दिली आहे. Papua New Guinea

या दुर्घटनेत मृतांची संख्या ३०० पेक्षा जास्त असल्याची भीती आहे. अद्याप बचावकार्य सुरू आहे. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

उद्धव ठाकरे यांचे विश्वासू शिलेदार पांडुरंग सकपाळ यांचे निधन

Pune : महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी, पुणे अंतर्गत विविध पदांची भरती

cyclone : रेमल चक्रीवादळ बंगाल मध्ये धडकणार, भारतीय कोस्ट गार्ड सतर्क

पुणे अपघात प्रकरणात अग्रवाल कुटूंबातील जेष्ठ व्यक्तीला अटक

ब्रेकिंग : बारावीच्या पुरवणी परीक्षेसंदर्भात महत्वाची बातमी

मोठी बातमी : लोकसभा निवडणूकीतच राज्यात आणखी एक निवडणूक जाहीर

राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद अंतर्गत भरती

Pune : महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी, पुणे अंतर्गत विविध पदांची भरती

ब्रेकिंग : अमिताभ बच्चन यांचा डुप्लिकेट म्हणून ओळखले जाणारे, अभिनेता फिरोज खान यांचे निधन

ब्रेकिंग : आरोग्यसेवक, ग्रामसेवक परिक्षांचे वेळापत्रक जाहीर!

संबंधित लेख

लोकप्रिय