Sunday, September 8, 2024
Homeराष्ट्रीयBreaking : उत्तर प्रदेश मध्ये दिब्रुगड एक्स्प्रेसचा भीषण अपघात; ४ ठार :...

Breaking : उत्तर प्रदेश मध्ये दिब्रुगड एक्स्प्रेसचा भीषण अपघात; ४ ठार : video

चंदीगड : उत्तरप्रदेशच्या गोंडामध्ये दुपारच्या वेळेस चंदीगड वरुन दिब्रूगढ कडे जाणाऱ्या दिब्रूगढ एक्सप्रेस ट्रेन रुळावरुन १० डबे रुळावरून घसरले, या मध्ये ४ प्रवासी मृत्यूमुखी पडले आहेत. अशी माहिती मिळत आहे. (Breaking)

रेल्वे अपघात रोखण्यासाठी कोट्यवधी खर्चून ‘कवच’ प्रणाली विकसित केली. मात्र, त्यानंतरही रेल्वे अपघात सुरू आहेत.दिब्रुगड एक्स्प्रेस (15904) ही ट्रेन गुरुवारी रात्री 11.39 वाजता चंदीगडहून सुटली. गुरुवारी दुपारी ही ट्रेन गोंडा-मानकापूर स्ठानकावर आली असता एक्स्प्रेसचे काही डबे अचानक रुळावरून घसरले. (Breaking)

काही प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितनुसार अपघातापूर्वी स्फोटासारखा मोठा आवाज झाला. त्यानंतर रेल्वे चालकाने ट्रेनचे इमर्जन्सी ब्रेक लावले. त्यानंतर पटरीवरून डब्बे घसरले असल्याचे रेल्वे चालक (लोको-पायलट) सांगत आहेत. (Breaking)

ही दुर्घटना उत्तर प्रदेशमधील गोंडा येथे घडली, ही ट्रेन चंदीगडहून दिब्रुगडला जात होती. ट्रेन जशी रुळावरुन उतरली प्रवाशांना काहीच कळले नाही प्रवाशी जोरजोरात ओरडू लागले, ट्रेन थांबताच प्रवाशांना रेल्वेच्या डब्ब्यातून बाहेर काढण्यात आले.

संबंधित लेख

लोकप्रिय