मुंबई : 2012 पासून सरकारने भरती बंद केली होती. त्यानंतर 2017 मध्ये 12 हजार पदांसाठी भरती काढली. ही प्रक्रिया पुढे कोरोनामुळे रखडली. 2023 मध्ये 30 हजार पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली. त्यामुळे भरतीच्या प्रतिक्षेत असलेल्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. शिक्षक भरतीसाठी डेडलाईन जाहीर करण्यात आली असून लवकरच भरती प्रक्रिया सुरु होईल, असे शिक्षणमंत्री दीपक केसरकर मंगळवारी विधान परिषदेत सांगितले.
राज्यातील शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. येत्या तीन महिन्यात 24 ऑक्टोबरपर्यंत शिक्षक भरतीची प्रक्रिया पूर्ण करणार असल्याची घोषणा शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी मंगळवारी विधान परिषदेत केली. यावेळी त्यांनी भरती प्रक्रियेचा कार्यक्रमही जाहीर केला.
शिक्षक सदस्य सुधाकर अडबाले यांनी शिक्षक भरतीबाबत तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. या चर्चेला उत्तर देताना मंत्री केसरकर म्हणाले, शिक्षक भरती प्रक्रियेवर उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने स्वाधिकारे दखल घेत स्थगिती दिली होती. न्यायालयाने ही स्थगिती उठविली असून शिक्षक भरती सुरू झाली आहे. या भरतीचे वेळापत्रक निश्चित करण्यात आले आहे. 24 ऑक्टोबरपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल.
न्यायालयाची स्थगिती अनपेक्षित होती. या मधल्या काळात आंतरजिल्हा बदल्या झाल्या. त्यामुळे अनेक ठिकाणी शिक्षकांची पदे रिक्त झाली. या रिक्त पदांमुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये, यासाठी तात्पुरती व्यवस्था म्हणून निवृत्त शिक्षकांना संधी देण्यात आली आहे. ही कायमस्वरूपी व्यवस्था नाही, असेही उत्तर मंत्री केसरकर यांनी दिले.
■ असा आहे भरती कार्यक्रम !
● या शिक्षक भरतीसाठी जिल्हा परिषदांनी आपली बिंदुनामावली कायम करून पोर्टलवर जाहिरातीसाठी 15 ते 31 ऑगस्ट 2023 हा कालावधी निश्चित करण्यात आला आहे.
● उमेदवारांनी प्राधान्यक्रम देण्यासाठी 1 ते 15 सप्टेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. मुलाखतीसह गुणवत्ता यादी 10 ऑक्टोबरला प्रसिद्ध केली जाईल.
● मुलाखतीशिवाय पदभरती उमेदवारांची पडताळणीसाठी 11 ते 21 ऑक्टोबर आणि जिल्हास्तरीय समुपदेशनासाठी 21 ते 24 ऑक्टोबर हा कालावधी निश्चित करण्यात आला आहे.
हे ही वाचा :
सुवर्णसंधी ! सरकारी रुग्णालयात 14,000 पदभरती !
रत्नागिरी येथे महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित अंतर्गत भरती; आजच करा अर्ज
कराड येथे महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित अंतर्गत रिक्त पदांसाठी भरती
PCM : पुणे महानगरपालिका अंतर्गत विविध पदांसाठी भरती; आजच करा अर्ज !
SSC : स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 1876 जागांसाठी नवीन भरती; आजच करा अर्ज!
सांगली येथे महापारेषण अंतर्गत भरती; 3 ऑगस्ट 2023 अर्ज करण्याची शेवटची तारीख
पिंपरी चिंचवड सायन्स पार्क अंतर्गत भरती; 31 जुलै 2023 अर्ज करण्याची शेवटची तारीख
Mahatransco : पुणे येथे महापारेषण अंतर्गत भरती; आजच करा अर्ज !
MCGM : मुंबई महापालिकेत विविध पदांची नवीन भरती; पगार 25000 रूपये
मेगा भरती : महाराष्ट्र नगरपरिषद संचालनालय अंतर्गत 1782 जागांसाठी भरती
ठाणे सिव्हिल हॉस्पिटल अंतर्गत विविध पदांसाठी भरती; आजच करा अर्ज
महाराष्ट्र शासनाच्या अर्थ व सांख्यिकी संचालनालयात बंपर भरती, 10वी ते पदवीधरांना संधी
Bank of Maharashtra : बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये विविध पदांच्या 400 जागांवर भरती
HCL : हिंदुस्तान कॉपर लिमिटेडमध्ये विविध पदांसाठी बंपर भरती; 10वी, ITI उत्तीर्णांसाठी संधी
Railway : पश्चिम रेल्वे मुंबई मार्फत 3624 जागांसाठी आजपासून अर्ज प्रक्रिया सुरु; आजच करा अर्ज
UPSC : संघ लोकसेवा आयोग मार्फत विविध पदांसाठी भरती
मेगा भरती : एकलव्य मॉडेल निवासी शाळा अंतर्गत 4062 पदांची भरती