औरंगाबाद : औरंगाबाद शहरातील लेबर कॉलनी परिसरात प्रशासनाने मोठी कारवाई सुरू केली आहे. लेबर कॉलनी परिसरात मोडकळीस आलेली घरं सकाळी साडेसहापासून जमीनदोस्त करण्याची कारवाईला सुरुवात झाली आहे.
औरंगाबाद शहरातील लेबर कॉलनी इथे १९५३ साली २० एकर भूखंडात प्रशासकीय अधिकाऱ्यांसाठी घरं बांधण्यात आली होती. ही प्रशासकीय इमारत जीर्ण झालेली होती. या ठिकाणी बांधलेली घरंही अनधिकृत असल्याचे सांगण्यात येत होते. त्यामुळे ही जुनी झालेली घरे पाडून जिल्हा प्रशासन ही जागा आपल्या ताब्यात घेत आहे. गेल्या सहा महिन्यापासून इथल्या रहिवाशांचा घरे पाडण्याला आणि रहिवाशी हटवण्याला कडाडून विरोध केला होता, मात्र आता ३३८ घरे पाडण्याचे आदेश उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाने दिलेले असल्याने कारवाई करण्यात येत आहे.
स्थानिक रहिवाशांचा विरोध लक्षात घेऊन या कारवाईसाठी ५०० पोलिस, १५० अधिकाऱ्यांचा बंदोबस्त असून ५० जेसीबी आणि २०० मजुर काम करीत आहेत. कारवाई दरम्यान कोणताही गोंधळ होऊ नये म्हणून प्रशासनाने या परिसरात जमावबंदी लागू करण्यात आली आहे.
जिल्हा निवड समिती, हिंगोली अंतर्गत रिक्त पदांसाठी थेट मुलाखतीद्वारे भरती, 13 मे 2022 शेवटची तारीख
राष्ट्रीय तांत्रिक संशोधन संस्थेत तब्बल 206 पदांसाठी भरती, 16 मे अर्ज करण्याची शेवटची तारीख
जुन्नर एज्युकेशन सोसायटी अंतर्गत विविध पदांसाठी भरती, थेट मुलाखतीद्वारे होणार निवड !