Thursday, August 11, 2022
Homeग्रामीणबोपखेल : डेंग्यू, मलेरिया, स्वाइन फ्लूसारख्या आजारावर उपाययोजना करण्यात यावी - भाग्यदेव...

बोपखेल : डेंग्यू, मलेरिया, स्वाइन फ्लूसारख्या आजारावर उपाययोजना करण्यात यावी – भाग्यदेव घुले यांची आयुक्तांकडे मागणी

spot_imgspot_imgspot_imgspot_img

बोपखेल : बोपखेल (रामनगर- गणेशनगर) भागात डेंग्यू, मलेरिया, स्वाइन फ्लूसारख्या आजारावर उपाययोजना करण्यात यावी, अशी मागणी भाग्यदेव एकनाथ घुले यांनी आयुक्तांकडे केली आहे.

पावसाळा सुरु झाल्याने पिंपरी चिंचवड शहरात मोठ्या प्रमाणात डासांचा उपद्रव वाढला आहे. त्यामुळे थंडी वाजून येणे, ताप येणे, अंग व डोके दुखणे यामुळे डेंगू, मलेरिया साथीचा प्रादुर्भाव होत आहे. यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिका आरोग्य विभागा मार्फत योग्य ती खबरदारी घेतली जावी.

भाग्यदेव घुले म्हणाले, पिंपरी चिंचवड शहरात ह्या आजाराचे रुग्ण मोठ्या प्रमाणत वाढत असून महापालिकच्या वतीने धूर फवारणी, औषध फवारणी, कोरडा दिवस पाळणे या उपाय योजना होताना दिसत नाही. तसेच परिसरातील नाल्यामध्ये राडारोडा, कचरा प्लास्टिक अडकून पडल्याने नाला तुंबूत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण तयार होत आहे. त्यामुळे महानगरपालिका आरोग्य विभागाच्या वतीने या आजाराचा फैलाव रोखण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात अशी मागणी आयुक्त राजेश पाटील यांच्याकडे करण्यात आली आहे.

व्हाट्सऍप ग्रुप सहभाग

आमच्या बातम्या थेट आपल्या मोबाईल मध्ये वाचण्यासाठी आजच सदस्य व्हा.

संबंधित लेख

WhatsApp Group

आमच्या बातम्या थेट आपल्या मोबाईल मध्ये वाचण्यासाठी आजच सदस्य व्हा.

- Advertisment -

लोकप्रिय