आतापर्यंत आपल्या सर्व मर्यादा पार करत उर्फी जावेदने आपली फॅशन दाखवली आहे. तिच्या निरनिराळ्या आणि बोल्ड फॅशनमुळे ती नेहमीच चर्चेचा विषय ठरत आली आहे. मात्र यावेळी उर्फीला जावेदला टक्कर देताना एक अभिनेत्री दिसून आली. तिने उर्फीला टक्कर देत बोल्ड, न्यूड फोटोशूट केल्याचं पहायला मिळालं. तिच्या या फोटोशूटने सध्या इंटरनेटचं वातावरण गरम केलं आहे. सध्या सोशल मीडियावर एकच चर्चा पहायला मिळत आहे ती म्हणजे अभिनेत्री निकिता रावलने केलेल्या न्यूड फोटोशूटची.
निकिताचं हे फोटोशूट अभिनेत्री कियारा अडवाणी सारखं आहे. मात्र या फोटोंनी सोशल मीडियावर एकच खळबळ उडवली आहे. या फोटोशूटमध्ये निकिताने आपल्या शरिराचा काही भाग पानांनी झाकलेला दिसत आहे.निकिताच्या या फोटोशूटवर अनेक प्रतिक्रिया येत आहेत.अनेकांनी ती उर्फीला टक्कर देत असल्याचं म्हटलंय. तर काहींनी कियारा अडवाणीची कॉपी केली असल्याचं म्हटलंय. एकंदरीत तिच्या फोटोशूटने सोशल मीडियाचं वातावरण गरम झालंय. दरम्यान, निकिता रावल साऊथसोबत बॉलिवूडमध्ये सक्रिय आहे.
तिने अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. याशिवाय ती आयटम नंबरमुळेही लोकप्रिय आहे. ती अनिल कपूर आणि शेफाली शाहसोबत ‘ब्लॅक इन व्हाइट’ चित्रपटात दिसली होती. याशिवाय निकिताने ‘मिस्टर हॉट अँड मिस्टर कूल’ आणि ‘द हीरो अभिमन्यू’मध्येही काम केले आहे.