रत्नागिरी : शरीरसौष्ठव स्पर्धेत 40 पेक्षा अधिक पदके व प्रमाणपत्रे मिळविलेल्या राहूरी येथील सखाहरी शांताराम बर्डे या बाॅडी बिल्डरची बिरसा फायटर्स महाराष्ट्र राज्य सहसचिव पदी निवड करण्यात आली आहे.
बिरसा फायटर्सचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 21 जुलै रोजी ऑनलाईन सभेत राज्य पदाधिकारी यांच्याशी चर्चा करून पहेलवान सखाहरी बर्डे यांची बिरसा फायटर्स महाराष्ट्र राज्य कार्यकारिणीत वर्णी लागली आहे. ऑनलाईन, व्हाट्सएप व फोनद्वारे चर्चेत राज्याच्या मुख्य पदाधिकारी यांनी सहभाग नोंदवला व सर्वांनी सखाहरी शांताराम बर्डे यांना राज्य कार्यकारिणीत घेण्याचे ठरवले. यापूर्वीच सखाहरी बर्डे यांनी बिरसा फायटर्स संघटनेत काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यामुळे आता बिरसा फायटर्स मध्ये वकील, आर्मी नंतर बाॅडी बिल्डर सुद्धा काम करायला आल्यामुळे बिरसा फायटर्स टिम व संघटना अधिकच मजबूत झाली आहे.
सखाहरी शांताराम बर्डे या आदिवासी तरूणाने शरीरसौष्ठव स्पर्धेत 40 पेक्षा अधिक पदके व प्रमाणपत्रे मिळवली आहेत. त्याचबरोबर कला शाखेत उच्च शिक्षण घेतले आहे. सखाहरी बर्डे हा एक मेहनती,होतकरू तरूण पहेलवान आहे. गरीब परिस्थितीवर मात करत त्याचा जीवनात संघर्ष सुरू आहे. बिरसा फायटर्स टिमचे काम आवडल्यामुळे त्यांनी बिरसा फायटर्स मध्ये येण्याचा निर्णय घेतला आहे. बिरसा फायटर्स संघटनेच्या माध्यमातून आदिवासी समाजाच्या विकासासाठी खूप काही कामे करायची आहेत, अशी प्रतिक्रिया नवनिर्वाचित सहसचिव सखाहरी बर्डे यांनी व्यक्त केली आहे.