Saturday, December 7, 2024
Homeराज्यशालेय विद्यार्थ्यांना आता दुरदर्शनवर अभ्यासक्रमाचे धडे

शालेय विद्यार्थ्यांना आता दुरदर्शनवर अभ्यासक्रमाचे धडे

मुंबई (विशेष प्रतिनिधी) :- 

           कोरोनाच्या थैमानाने सर्व मानवी जीवन चक्र कोलमडून पडलेले आहे, त्याचा सर्वच क्षेत्रावर परिणाम झालेला आहे.  शिक्षण क्षेत्रावर सुद्धा मोठा परिणाम झालेला असून ऑनलाईन शिक्षणाच्या मदतीने विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या पातळीवर उपाय योजना राबविल्या जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने उद्या पासून १ ली  ते १२ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी दूरदर्शन चॅनलवर अभ्यासक्रमावर कार्यक्रम होणार आहे. तसेच शासनाने इयत्ता १ली ते १२ पर्यंतची सर्व पुस्तके PDF स्वरूपात उपलब्ध करून देणार आहे.

वेळ खालीलप्रमाणे:

१०:३० ते ११.०० – पहिली ते पाचवी

११.०० ते १२.०० – ६ वी ते ९ वी व ११वी

१.०० ते २.००     – १० वी व १२ वी

संबंधित लेख

लोकप्रिय