कोल्हापूर (२१ मे):
कोरोनाने जगभर थैमान घातला आहे. देशातील परिस्थिती चिंताजनक असताना पर्यावरण प्रभाव मुल्यांकन नियमावलीत सुधारणा करण्याची शासनाला घाई का झाली आहे? असा सवाल प्रसिध्दी पत्रकाराद्वारे लोकपर्यावरण मंचाचे जिल्हा समन्वयक रत्नदिप सरोदे यांनी केला आहे.
नवीन मसुद्यामध्ये नवीन धरणे, खाणी, विमानतळ, महामार्ग यांसारख्या नवीन औद्योगिक प्रकल्पांंना मंजूरी देण्याच्या अटी शिथिल करण्यात आल्या आहेत. त्यामुळे शिथिल केलेल्या अटी त्वरित रद्द कराव्यात, अशी मागणी लोकपर्यावरण मंचच्या वतीने करण्यात आली आहे. तसेच लोकपर्यावरण मंच त्याबाबतच्या सुचना शासनाला सादर करणार आहे.