(माजलगाव/प्रतिनिधी):- पेट्रोल-डीझेलच्या प्रचंड प्रमाणात भाववाढी च्या विरोधात माजलगाव शहरात आज 29 जून 2020 रोजी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने तालुका सचिव काॅ. मुसद्दीक बाबा सर यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने करून उपजिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
कोरोना रोगाच्या महामारीत करण्यात आलेल्या लॉकडाउन मूळे सर्व सामान्य माणूस, शेतमजूर, कामगार,छोटे दूकानदार, छोटे उद्योग सर्वच आर्थिक अडचणीत असताना मात्र केंद्र सरकार सतत दररोज पेट्रोल व डिझेल ची भाववाढ करीत आहे. त्याचाच परिणाम वाहतुकीवर होऊन आज देशात प्रत्येक वस्तू महाग झालेली असून महागाई बेसुमार वाढली आहे. सर्व सामान्यांचे जगणे मुश्किल झाले आहे. याचा परिणाम शेतकरी, शेतमजूर, कामगार, सर्व श्रमीक, कष्टकरी व सर्व सामान्य जनतेवर झाला आहे.
या निवेदनात पेट्रोल व डिझेल दरवाढ तात्काळ रोखून दरवाढ कमी करण्यात यावी, शेतकर्यांना नवीन पीक कर्ज जाचक अटी रद्द करून तात्काळ कर्ज वाटप करा. आयकर लागू नसणार्या सर्व सामान्य कुटूंबाला 8000 रुपयांची आर्थिक मदत जाहीर करा. छोटया उदयोग धंदे वाल्यांना तात्काळ कर्ज वाटप करा. सर्व सामान्य कुटूंबाला सहा महीने मोफत राशन द्या. ईत्यादी मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यावेळी कोवीड 19 चे सर्व नियमांचे पालन करून आंदोलन करण्यात आले. यावेळी माकपचे तालुका सचिव काॅ. मुसद्दीक बाबा सर, कॉ. सादेक पठाण, कॉ. शिवाजी कुरे, कॉ. शेख समीर, कॉ. सय्यद याकूब, कॉ. सय्यद फारुख, कॉ. विठ्ठल, कॉ. आशोक पोपळे, कॉ. बालासाहेब तौर यांच्या सह आदी कार्यकर्ते उपस्थित होते