माजलगाव (प्रतिनिधी) :
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या शहर शाखेच्या वतीने शहरातील आझादनगर, गौतमनगरसह विविध भागात गोरगरीब व गरजूवंताना अन्नधान्य किट्सचे वाटप करण्यात आले.
सध्या भारतभर लॉकडाउन असल्याने काम बंद आहे. त्यामुळे कामगार, मजूर वर्गाला आपल्या कुटुंबाची उपजीवीका भागविण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. अशा गोरगरीब व गरजूवंताना मदत म्हणून मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या शहर शाखेच्या वतीने देणगी जमा करून शेकडशेकडो अन्नधान्याचे तयार करण्यात आले होते. सर्व किट्सचे वाटप माजलगाव शहरामध्ये करण्यात आले.
कोरोनाच्या चिंताजनक परिस्थितीत माकप गरीब, कष्टकरी, कामगार, मजूर, श्रमिक जनतेसोबत खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभा आहे. असे माकपचे तालुका सचिव मुसद्दीक बाबा सरयांनी सांगितले.
यावेळी माकपचे तालुका सचिव बाबा सर, पक्षाचे जिल्हा कमिटी सदस्य ऍड.सय्यद याकूब, विठ्ठल सक्राते, सादेक पठाण, शेख चून्नू, शेषेराव आबूज, शेख मुस्तकीम, रूपेश चव्हाण, शेख महेबूब, सय्यद गुलाब, सय्यद अली, शेख महेंदीहसन, शेख समीर, शेख फय्याज, सय्यद फारुक आदी उपस्थित होते.