Monday, February 3, 2025

वाहतूकदारांच्या प्रश्नाबाबत प्रादेशिक परिवहन अधिकारी स्टीव्हन अल्वारिस यांचा सकारात्मक प्रतिसाद.

प्रतिनिधी :- प्रादेशिक परिवहन अधिकारी स्टीव्हन अल्वारिस यांना खाजगी बस वाहतूकदार संघटनेच्या वतीने निवेदन नेऊन चर्चा करण्यात आली. 

        धुळे जिल्ह्यात सपशेल परिमट दिले जाते, त्यामुळे येथे पण द्या या मागणीला प्रतिसाद देत, आपण जिल्ह्यातील माहिती घेऊ. कोल्हापूरात टप्याटप्याने आपण सर्वच वाहतूक सुरळीत सुरू करणार आहोत. तसेच टँक्स माफ करण्यासाठीचा प्रस्ताव आर.टी.ए व परिवहन आयुक्तांकडे पाठवला जाईल असा सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे संघटनेने म्हटले आहे.      

         लक्झरी बसचा व्यवसाय तारण्यासाठी शासनाने आर्थिक पँकेज जाहीर करावे, सर्वात जास्त टँक्स खाजगी वाहतूकदारांना भरावा लागतो, त्यामुळे यावर्षी आमचा रोड टँक्स माफ करा, शासकीय बसेसना परवानगी देण्यात आली आहे; त्यामुळे खाजगी बसेसना पण परवानगी द्या, शारीरिक अंतर राखले जाईल आदी मागण्या करण्यात आल्या.

         यावेळी बस वाहतूकदारांचे अध्यक्ष सतीशचंद्र कांबळे, गौरव कुसळे, रफिक रावथर, बाबा बुचडे, दिलदार मुजावर आदीसह उपस्थित होते.


Related Articles

- Advertisement -

Latest Articles