Friday, March 14, 2025

एस.एम.देशमुख यांची विधान परिषदेवर नियुक्त करण्याची वडवणी तालुका पत्रकार संघाची मागणी

एस.एम.देशमुख यांची विधान परिषदेवर नियुक्त करण्याची वडवणी तालुका पत्रकार संघाची मागणी

वडवणी :—
पत्रकार संरक्षण कायद्याचे जणक आणि महाराष्ट्रातील पत्रकारांचे आधारस्तंभ तथा मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्थ एस. एम. देशमुख यांची राज्यपाल कोट्यातून विधान परिषद सदस्य म्हणून नियुक्ती करावी अशी मागणी वडवणी तालुका पत्रकार संघाने महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री ऊध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर आदी मंत्री यांना ईमेल व्दारे निवेदन पाठवून केली आहे.
वडवणी तालुका पत्रकार संघाने पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे. महामहिम राज्यपालांकडून विधानपरिषदेवर १२ सदस्यांची नियुक्ती केली जाणार आहे. राज्यपालांनी आपल्या कोटयातून विचारवंत, साहित्यीक, कलावंत, पत्रकाराची नियुक्ती करावी, अशी अपेक्षा असते.राज्यपालांनी ही अपेक्षा पूर्ण करतांना ज्येष्ठ पत्रकार एस. एम. देशमुख यांच्या नावाचा प्राधान्याने विचार करावा, अशी विनंती या निवेदनात केली आहे. या निवेदनात पूढे म्हटले आहे की, एस. एम. देशमुख हे मागील ३५ वर्षापासून पत्रकारीतेत सक्रीय आहेत. त्यांनी २३ वर्ष विविध वृत्तमानपत्रात यशस्वी संपादक म्हणून कार्य केले आहे. राज्यातील पत्रकारांचे प्रश्नांना त्यांनी वाचा फोडली आहे. पत्रकारांना संघटीत केले आहे व राज्यात पत्रकारांची मोठी चळवळ उभी केली आहे. पत्रकारांना पेन्शन मिळाली पाहिजे. तसेच पत्रकारांना कायदेशिर संरक्षण मिळावे यासाठी त्यांनी लढा उभारला. या लढयामुळेच शासनाला पत्रकारांच्या मागण्या मान्य कराव्या लागल्या.

एस.एम.देशमुख हे लेखक म्हणूनही प्रसिध्द आहेत. त्यांची आठ पुस्तके प्रसिध्द झाले असून विविध दैनिकात पाच हजार लेख प्रसिध्द झाले आहेत. राज्यपालांनी आपल्या कोटयातून त्यांना विधान परिषदेवर नियुक्त करावे अशी मागणी मराठी पत्रकार परिषद संलग्न महाराष्ट्रातील सर्व पत्रकार संघटना, जिल्हा संघ, तालुका संघाकडून होत असुन वडवणी तालुका पत्रकार संघाने देखील महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री ऊध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर आदी मंत्री यांना ईमेल व्दारे निवेदन पाठवून मागणी केली आहे

वडवणी तालुका पत्रकार संघाच्या मागणीला पाठबळ..

पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी आपले आयुष्य पणाला लावणारे मा. एस.एम. देशमुख यांची विधानपरिषदेवर नियुक्ती व्हावी हि वडवणी तालुका पत्रकार संघाची मागणी आहे.वडवणी तालुका पत्रकार संघाचा दिनांक ९ जून २०१९ साली राज्यातील सर्व तालुका अध्यक्षांचा राज्यस्तरीय मेळावा वडवणी येथे झाला.या मेळाव्याला मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख, विश्वस्त किरण नाईक,तात्कालीन अध्यक्ष सिध्दार्थ शर्मा,आजतकचे संपादक साहील जोशी,दैनिक सकाळचे कार्यकारी संपादक संजय वरकड,आमदार आर.टी.देशमुख,माजी आमदार केशवराव आंधळे,भाजपचे नेते रमेश आडसकर,ह.भ.प.अण्णा महाराज दुटाळ,शिवसेना नेते विनायक मुळे,मेळाव्याचे स्वागताध्यक्ष अमोल आंधळे,या मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत वडवणी ता. पत्रकार संघाचे अध्यक्ष बाबुराव जेधे यांनी महाराष्ट्र राज्याच्या विधानपरिषदेवर एस.एम. देशमुख यांची नियुक्ती व्हावी अशी जाहीर मागणी वडवणी तालुका पत्रकार संघाने व्यासपीठावरुन केली. आज याच मागणीला बीड जिल्हा पत्रकार संघाने जिवीत स्वरूप आणून राज्यातील तमाम पत्रकारांच्या मागणीला पाठबळ दिले.याबद्दल बीड जिल्हा पत्रकार संघाचे आभार मानुन राज्यातील सर्व पत्रकार संघानी एस.एम.देशमुख यांच्या नियुक्ती साठी मागणी करावी असे आवाहन वडवणी तालुका पत्रकार संघाचे प्रमुख मार्गदर्शक,अधिस्विकृती सदस्य जेष्ठ पत्रकार सुभाषराव वाव्हळ,संस्थापक अध्यक्ष जानकीराम उजगरे,अध्यक्ष बाबुराव जेधे,माजी अध्यक्ष राम लंगे,सचिव अविनाश मुजमुले,पत्रकार विनोद जोशी,डि.एस.वाव्हळ,ज्ञानेश्वर लंगे,मच्छिंद्र मोरे,भैय्यासाहेब तांगडे,जगदीश गोरे,रामेश्वर गोंडे,लहु खारगे,शेख शरीफभाई,प्रवीण नाईकवाडे,हरी पवार,शेख ताहेरभाई,विजय हेंद्रे,बबलु कदम,धनंजय माने यांनी केले आहे.
————————————-

WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles