Sunday, May 18, 2025
---Advertisement---
---Advertisement---

शासकीय रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयाचा बाह्य रुग्ण विभाग २४ तास सुरु करण्याच्या हालचाली वर्ग १ ते वर्ग ४ श्रेणीची पदे भरण्यासंदर्भात शासनाने मागवला प्रस्ताव

---Advertisement---

(अंबाजोगाई/प्रतिनिधी) राज्यातील शासकीय रुग्णालये व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभाग २४ तास सुरु ठेवण्याच्या हालचाली वरीष्ठ पातळीवर सूरु करण्यात आल्या असून याबाबत वर्ग १ ते वर्ग ४ श्रेणीतील कर्मचाऱ्यांच्या आवश्यक पद निर्मिती संदर्भातील माहिती वैद्यकीय शिक्षण व सशोधन विभागाच्या संचालकांनी एक परिपत्रक काढून संबंधितांकडुन मागवली आहे.

---Advertisement---

याबाबतचा अधिक तपशील असा की, लातुर जिल्हा काँग्रेसचे सचीव बिभीषण सांगवीकर यांनी ७ मार्च २०२० रोजी वैद्यकीय शिक्षण मंत्री श्री. अमित देशमुख यांना एक निवेदन देवून राज्यातील शासकीय रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयातील बाह्यरुग्ण विभाग २४ तास सुरु करण्यात यावेत अशी मागणी केली होती. या निवेदना संदर्भात गांभीर्याने विचार करुन राज्याच्या वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाच्या संचालकांनी राज्यातील सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांना २९ जून २०२० रोजी एक परिपत्रक पाठवून वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभाग २४ तास सुरु करण्यासाठी वर्ग १ ते वर्ग ४ श्रेणीतील किती कर्मचाऱ्यांची व वैद्यकीय अधिकारी यांची पदे निर्माण करण्याची आवश्यकता असुन त्यांच्या वेतनावर किती अनावर्ती खर्च अपेक्षित आहे, याबाबतचा प्रस्ताव तयार करून अधिष्ठातांच्या अभिप्रायासह राज्याच्या वैद्यकीय शिक्षण संचालकांडे पाठवावा असे सुचीत केले आहे. संबंधित अधिष्ठातांच्या प्रस्ताव या विभागाक आल्यानंतर

वैद्यकीय महाविद्यालयाचा बाह्यरुग्ण विभाग २४ तास सुरु करण्याबाबतची पुढील कार्यवाही करणे शक्य होईल, असे या परीपत्रकात म्हटले आहे. या परिपत्रकावर वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाच्या संचालकांची स्वाक्षरी आहे.

WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles