Thursday, March 28, 2024
Homeग्रामीणमनोरुग्णाचा कैवारी अक्षय बोऱ्हाडे

मनोरुग्णाचा कैवारी अक्षय बोऱ्हाडे

साध्या घराण्यातील मुलगा अक्षय मोहन बोऱ्हाडे. ज्या वयात मजा-मस्ती, खेळणे बागडणे, मित्र-मैत्रिणींंच्या सोबत फिरण्याच्या वयात तो आज रस्त्यावर भिकारी म्हणून फिरणाऱ्या लोकांचा मनोरुग्णांचा कैवारी झाला. गरीब लोकांना त्यांच्या हक्काचा माणूस मिळावा हा अक्षयचा प्रयत्न. आजच्या कलियुगातील मुले साधा भिकारी दिसला तरी लांब लांब पळतात. त्यांच्याजवळ जाणाऱ्या लोकांना नाव ठेवतात. पण अक्षयने असं न करता. आज तो रस्त्यावर मनोरूग्ण, भिकारी, अनाथ लोकांची सेवा करतोय. तो आज मनोरुग्णांसाठी झडतोय. त्याला कोणी पगार देतो का ? त्याला कोणी पुरस्कार देतात का? एक सामान्य माणूस समाजसेवक म्हणून काम करतोय. त्यात कोणतेही राजकारण नाही. स्वतःचा फायदा नाही. तरी तो मनोरुग्णाची सेवा करतोय. 

           

संत गाडगेबाबा, डॉ. बाबा आमटे, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पावलावर पाऊल ठेऊ गोरगरीबांसाठी झगडतोय. त्याचे सर्व कुटुंब त्याच्यापाशी असताना देखील तो हे काम करतोय.

त्याच्या घासातला घास काढून देणारा अक्षय. मग आज त्याच्यावर ही वेळ का येते? कुठे गेले निषेध करणारे, कुठे गेला आता तुमचा मोर्चा. एक सामान्य समाज सेवक मुलावर अन्याय होतोय.

 

त्याला काहीतरी कारण सांगून; घरी बोलावून मारहाण केलं जातंय. तो कोणाच्या घरी चोरी करायला गेला नव्हता? तो राजकारण करत नाही? तो जातीवादी सुध्दा नाही?. मग हा अन्याय का त्याच्यावर. ती मोठी माणसं असली म्हणून काय झालं. आज अक्षयला मारहाण केलं. उद्या का नाही खून करणार त्याचा. त्याला पण त्याचे कुटुंब आहे की, त्याला पण जगण्याचा अधिकार आहे. तो पुढे जातोय तर त्याला मागे ओढलं जातंय. तो पुढारी लोकांना सारखे स्वतःचे खिसे भरत नाही.

         

बेवारस रस्त्यावर फिरणारे मनोरुग्णांसाठी समाजसेवा करतोय. मग त्याला मारहाण करण्याचे कारण काय?. आता कुठे गेले मिडीयावाले पेपर वाले. मोर्चा वाले ? अन्यायाविरुद्ध वाचा फोडणारी संस्था आता सगळे झोपले का?. आता कुठे गेली शिवरायाची तरुण पिढी. उठा जागे व्हा आणि अक्षयला न्याय मिळवून द्या. जर त्याच्या जागी एखादा पुढारी असता तर सर्व महाराष्ट्र पेटून उठला असता. आता अक्षय साठी सगळे झोपले का?. उठा पेटून उठा आणि त्याला न्याय मिळवून द्या.त्याला नाही निदान रस्त्यावर बेवारस मनोरुग्णांसाठी तरी जागे व्हा. आणि अक्षयला न्याय मिळवून द्या.

       

माझी समाज बांधवांना, तरुण पिढीला, पोलीस प्रशासनाला आणि मीडियावाल्यांना हात जोडून कळकळीची विनंती आहे. अक्षयला योग्य तो न्याय मिळवून द्या. तुमच्या घरातील एक मुलगा भाऊ म्हणून जागे व्हा. पेटून उठा आणि अक्षयल न्याय मिळवून द्या.

     

मंत्री-संत्री,आमदार-खासदार कोणी नाही कोणाचा. हे लोक फक्त निवडणूक आल्या की जागी होतात. निवडणूक झाली की खिश भरतात. माझं जनतेला एवढचं सांगन आहे की सामान्य माणूस हा माणसाला उपयोगी येतोय. म्हणून पुन्हा एकदा सांगतोय. हात जोडून कळकळीची विनंती करतो की अक्षयला न्याय मिळवून द्या!

योगेश बो-हाडे

9834516144


संबंधित लेख

 


- Advertisment -

लोकप्रिय