(अंबाजोगाई/प्रतिनिधी) बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे फळबाग अनुदान, कांदाचाळ अनुदान, ठिबक सिंचन अनुदान, शेततळे अनुदान अद्यापही शेतकऱ्यांना मिळालेले नाही, निधी उपलब्ध नाही हेच यामागील कारण असून शेतकऱ्यांना फळबाग, कांदाचाळ, ठिबक सिंचन, शेततळे अश्या विविध योजनेचे अनुदान त्वरीत मिळावे यासाठी तात्काळ निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी केज मतदार संघाच्या आमदार नमिताताई मुंदडा यांनी राज्याचे मुख्यमंत्री मा. उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.