Tuesday, April 22, 2025
---Advertisement---
---Advertisement---

साफसफाई कंत्राटी महिला कामगारांचे महानगरपालिकेसमोर ठिय्या आंदोलन

---Advertisement---

---Advertisement---

पिंपरी चिंचवड : 8 मार्च जागतिक महिला दिन जगभरामध्ये मोठ्या उत्साहात मध्ये साजरा केला जात आहे. परंतु पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत इतिहासात पहिल्यांदाच 8 मार्च जागतिक महिला दिनाच्या एक दिवस अगोदर ७ मार्च पासून पिंपरी चिंचवड महानगरपालिका समोर कंत्राटी पद्धतीने साफसफाई काम करणाऱ्या महिलांनी ठीया माडला असून महानगरपालिकेसमोर त्यांनी त्यांचा मुक्काम ठोकला आहे.

रात्रभर महानगरपालिकेसमोर रस्त्यावर झोपून महिलांनी हे आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्णय घेतला आहे हेच यावरून सिद्ध होत आहे, पिंपरी चिंचवड महानगरपालिके मध्ये सोळाशे महिला कंत्राटी पद्धतीने साफसफाई झाडलोट आदी प्रकारचे कामे करत आहेत.

गेल्या वीस वर्षापासून या महिला  काम करत आहेत, पूर्वी स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्थेच्या माध्यमातून हे काम केले जात होते परंतु स्वयंरोजगार सहकारी संस्थांनी महिलांच्या प्र फंड मध्ये घोटाळा करून त्यांचा प्र फंड खाल्ल्या व त्यांना किमान वेतन दिले नाही यामुळे महानगरपालिकेच्या वतीने अ ब क ड ह ग फ ई प्रभाग प्रमाणे  निविदा काढून मोठ्या ठेकेदारांना ही काम देण्यात आली. परंतु मोठ्या ठेकेदाराने देखील महिलांना किमान वेतन समान वेतन न देता त्यांना अत्यंत तुटपुंज्या पगारावर ते राबवून घेतले गेल्या चार वर्षापासून हा अन्याय सुरूच आहे,

यात ठेकेदाराने एटीएम पासबुक स्वतःकडे ठेवून महिलांचे बँकेत खाते कडून त्यांच्या बँक खात्याचा दुरुपयोग केला. याबाबत पिंपरी पोलीस स्टेशन येथे याप्रकरणी गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे.

कष्टकरी कामगार पंचायत वतीने वेळोवेळी आंदोलन मोर्चे करून महानगरपालिका आयुक्तांना निवेदन दिले, तसेच भाजपशासित पदाधिकाऱ्यांना देखील वेळोवेळी निवेदने दिली आहेत. परंतु आयुक्त आणि सत्ताधारी यांनी मात्र कोणत्याही प्रकारची दखल घेतली नाही. यामुळे कचऱ्यामध्ये पैसा खाण्याची प्रवृत्ती बळावली असून राजकीय व्यक्तीनिच  इतरांच्या नावाने हा ठेका  चालवत आहेत ते सिद्ध होत आहे. दोन महिन्यापासून पगार न  मिळाल्या मुळे व यासाठी घरात खायला नाही यामुळे एका विधवा मागासवर्गीय महिलेने हात उसने पैसे आणण्यासाठी साइटवर असताना प्रयत्न केले. परंतू त्या महिलेस उद्यापासून कामावर यायचे नाही असे सांगून तिला धमकी दिली यामुळे तिने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. दुसऱ्या एका प्रकरणात कामावरून कमी केल्यामुळे महिलांनी दुःख असे झाल्यामुळे चक्कर येऊन कोसळल्या असे प्रकार शाहूनगर भागात घडले. पगार थकला घराचे भाडे दिले नाही म्हणून एका महिलेला घरमालकाने घराच्या बाहेर काढले त्या महिलेने दोन मुलांसह रात्रभर रस्त्यावरती रात्र काढली ही घटना सकाळी तिने सर्व महिलांना सांगितले यामुळे महिलांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला.

यामुळे आता आम्ही हा अन्याय सहन करणार नाही आम्हाला कायम करा अशा प्रकारचा मागणी करत महिलांनी थेट महानगरपालिकेचे गेट गाटले, परंतु महापालिका आयुक्त स्वतः महापालिकेत असतानादेखील त्यांनी महिलांचे प्रश्न न सोडवता इतर  बैठकांमध्ये धन्यता मानत महिलांकडे दुर्लक्ष केले व सहाय्यक आयुक्त खोत यांना याप्रश्‍नी लक्ष देण्यास सांगितले.

सायक आयुक्त खोत यांच्या कडून कोणत्याही प्रकारचे ठोस आश्‍वासन न मिळाल्याने महिला अधिकच आक्रमक झाल्या व जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही महानगरपालिकेचे गेट सोडणार नाही अशा प्रकारचा निर्णय घेत त्यांनी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या गेट  समोर ठिय्या मांडला संपूर्ण रात्र त्यांनी महानगरपालिकेसमोर काढले आहे. जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने देशभर महिलांचा सन्मान होत असताना पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने मात्र साफ सफाई कामगार महिलांवर मोठ्या प्रमाणामध्ये अन्याय अत्याचार केला जात आहे हेच यावरून सिद्ध होत आहे. यामुळे महापालिका आयुक्त सत्ताधारी हे या सर्व प्रकरणात दोषी आहेत.

त्यांनी वेळीच दखल घेतली असती तर हा प्रकार थांबला असता, परंतु महापालिका आयुक्त व सत्ताधारी यांनी ठेकेदारांना प्रास्थान देत त्यांना या सर्व प्रकरणांमध्ये मदत केली. यामुळे महिलांवरील अन्याय अत्याचार वाढत असून या प्रकरणी आता आयुक्त वरच गुन्हे दाखल करावेत अशा प्रकारची मागणी  देखील या महिला करत आहेत.

– क्रांतिकुमार कडुलकर


WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles