Thursday, April 25, 2024
Homeताज्या बातम्याशेतकऱ्यांच्या विविध मागण्यांचे लाल बावटा किसान सभेने सामाजिक न्यायमंत्री तथा पालकमंत्री...

शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांचे लाल बावटा किसान सभेने सामाजिक न्यायमंत्री तथा पालकमंत्री व जिल्हाधिकारी साहेब यांना दिले निवेदन*


परळी(प्रतिनिधी)नागापुर येथील वाण धरण परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतीला पाणी मिळावे यासाठी महाराष्ट्र किसान सभेच्या वतीने  पालकमंत्री ना. धनंजय मुंडे व जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांना निवेदन देण्यात आले. 

    शनिवार दि. 10 रोजी नागापुर येथील वाण धरणावर पालकमंत्री ना. धनंजय मुंडे व जिल्हाधिकारी राहुल रेखावार आले होते. त्यावेळी महाराष्ट्रराज्य किसान सभेच्या वतीने वाण धरण लाभ क्षेत्रातील शेतीला पाणी मिळावे यासह माजलगाव धरणाचे पाणी वाण धरणात सोडण्यात यावे. वाण धरणाचे पाणी रब्बी पिकासाठी तात्काळ मिळाले पाहिजे. वाण धरणावरील उतरून नेलेले ट्रांसफार्मर तात्काळ बसवले पाहिजे. 2015 पासून बंद असलेल्या मोटारीचे बिल माफ झाले पाहिजे. तीन महिन्यापासून नादुरुस्त असलेला ३३ के.व्ही.मधील ट्रांसफार्मर तात्काळ भरला पाहिजे. या मागण्यांचे निवेदन पालकमंत्री मुंडे व जिल्हाधिकारी रेखावार यांना निवेदन देण्यात आले. यावेळी किसान सभेचे जिल्हा सचिव काॅ. मुरलीधर नागरगोजे, काॅ. अशोक नागरगोजे, काॅ. मनोज स्वामी, काॅ. विष्णु नागरगोजे, काॅ. धनंजय वाव्हळे, संजय नवघरे, विजय घुगे, रावन नागरगोजे, बालासाहेब गुट्टे, अनंत गुट्टे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय