लखनौ : कर्नाटकात कॉंग्रेसने सत्तेचे स्वप्न प्रत्यक्षात उतरवले असून भाजपाला मोठा पराभव स्वीकारावा लागला आहे. या प्रभावानंतर भाजपावर चौफेर टीका होत आहे.
कर्नाटकातील कॉंग्रेसच्या विजयावर समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी ट्विट करत जहरी टीका केली आहे. ट्विटरवर म्हटले आहे की, ‘कर्नाटक चा हा संदेश आहे की भाजपच्या नकारात्मक, जातीयवादी, भ्रष्ट, श्रीमंताभिमुख, महिला-युवकविरोधी, समाजकंटक, खोटा प्रचार, व्यक्तिवादी राजकारणाचा ‘शेवट’ सुरू झाला आहे.
हे नव्या भारताचा सकरात्मक कौल असून बेरोजगारी,भ्रष्टाचार, आणि महागाईच्या विरोधात जनतेने दिलेला हा स्पष्ट कौल आहे असेही त्यांनी म्हटले आहे.
हे ही वाचा :
जयंत पाटील यांच्यावरील ईडीच्या कारवाईचा निषेध करत माकप कडून कडवी टिका
बोगस बियाणे, खते, बोगस किटकनाशक प्रकरणात गुन्हे दाखल करा – पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील
कर्नाटकात भाजप की काँग्रेस ? ‘जेडीए’ किंगमेकर ठरणार
कर्नाटक निवडणूक निकाल : काँग्रेस आघाडीवर तर भाजप पिछाडीवर; तर बेळगावात…
NTPC : नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लि. अंतर्गत मोठी भरती