भिवानी, हरियाणा : भारतीय जनता पक्षाचे (भाजप) राज्यसभेतील खासदार रामचंद्र जांगरा (Ramchandra Jangra) यांनी जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे २२ एप्रिल २०२५ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याबाबत केलेल्या वादग्रस्त विधानामुळे संताप व्यक्त केला जात आहे. (हेही वाचा : ‘ईडीने सर्व मर्यादा ओलांडल्या’ सर्वोच्च न्यायालयाचा ईडीवर संताप)
खासदार रामचंद्र जांगरा यांनी भिवानी येथे आयोजित एका कार्यक्रमात बोलताना, या हल्ल्यात आपले पती गमावलेल्या महिलांवर टीका करताना त्या “योद्ध्याच्या भावनेने लढल्या नाहीत” आणि “त्यांच्यात उत्साह, जोश आणि हिम्मत नव्हती” असे वादग्रस्त विधान केले आहे. या विधानामुळे विरोधी पक्षांनी तीव्र निषेध व्यक्त केला आहे. (हेही वाचा : संरक्षण संशोधन व विकास संघटना अंतर्गत भरती, आजच अर्ज करा)
पहलगाम येथील बायसरण मेडोज येथे २२ एप्रिल २०२५ रोजी दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात २६ नागरिकांचा मृत्यू झाला, त्यापैकी २५ पर्यटक आणि एक स्थानिक व्यक्ती होती. राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) अजूनही हल्लेखोर दहशतवाद्यांचा शोध घेत आहे. (हेही वाचा : सलमान खानच्या घरात घुसण्याचा प्रयत्न करणाऱ्या महिलेला अटक)
Ramchandra Jangra यांचे वादग्रस्त विधान
भिवानी येथे देवी अहिल्याबाई होळकर यांच्या ३००व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना जांगरा यांनी म्हटले, “जर त्यांनी अहिल्याबाईंचा इतिहास वाचला असता, तर कोणीही त्यांच्यासमोर तिच्या पतीला गोळ्या घालू शकले नसते, जरी ती स्वतः शहीद झाली असती. पहलगाममध्ये ज्या बहिणींनी आपले पती गमावले, त्यांच्यात वीरांगनेचा भाव नव्हता, जोश नव्हता, जज्बा नव्हता, हृदय नव्हता, म्हणून त्या हात जोडून गोळीच्या शिकार झाल्या.” त्यांनी पुढे असेही सुचवले की, जर या पर्यटकांना अग्निवीर प्रशिक्षण मिळाले असते, तर दहशतवाद्यांना घेरता आले असते आणि जीवितहानी कमी झाली असती. (हेही वाचा : शासकीय विश्रामगृहात कोट्यवधी रुपयांची रक्कम सापडल्याने खळबळ)
रामचंद्र जांगडा कोण आहेत? |
रामचंद्र जांगरा हे हरियाणातील माजी मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांचे निकटवर्ती मानले जातात. त्यांनी आपली राजकीय कारकीर्द लोकदल (बहुगुणा) पक्षापासून सुरू केली आणि १९८७ मध्ये साफिदोनमधून विधानसभा निवडणूक लढवली, परंतु त्यांना यश मिळाले नाही. १९९१ आणि २००४ मध्ये हरियाणा विकास पक्षातून निवडणूक लढवूनही ते पराभूत झाले. नंतर ते भाजपमध्ये सामील झाले आणि २०२० मध्ये राज्यसभेवर निवडून गेले. (हेही वाचा : हायवेवर कार थांबून भाजप नेत्याचे महिले सोबत शारिरीक संबंध, व्हिडिओ व्हायरल)