Jayashree Thorat : संगमनेरमध्ये भाजप आणि काँग्रेस या दोन प्रमुख पक्षांमध्ये राजकीय वातावरण पेटलं आहे.संगमनेर तालुक्यातील धांदरफळ गावात काल 25 ऑक्टोबररोजी भाजपचे माजी खासदार सुजय विखे पाटील यांच्या युवा संकल्प मेळाव्यात भाजप नेते वसंतराव देशमुख यांनी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्या कन्या जयश्री थोरात यांच्याविषयी खालच्या पातळीवर आक्षेपार्ह वक्तव्य केले. या टीकेनंतर संगमनेरमधील राजकीय वातावरण अधिकच तापले असून काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत.
भाजप नेते वसंतराव देशमुख यांनी या सभेत बाळासाहेब थोरात यांच्या मुलीबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करण्यात आलं. “तुमच्या कन्येला समजवा, नाहीतर आम्ही निवडणुकीच्या काळात मैदानात उतरलो, तर तुमची मुलगी घराबाहेर पडणार नाही. सुजय विखे पाटील, त्यांना ताई म्हणातात. पण सुजयदादा या ताईचे पराक्रम सगळ्या तालुक्याला माहिती आहे.”, असं वक्तव्य भाजप नेते वसंतराव देशमुख यांनी केलं.
टीकेनंतर काँग्रेस समर्थकांनी विरोधाचा तीव्र सूर लावत शुक्रवारी रात्री शहरात ठिय्या आंदोलन केले. जयश्री थोरात आणि दुर्गाताई तांबे यांच्या नेतृत्वाखाली शेकडो काँग्रेस समर्थकांनी पोलीस ठाण्याबाहेर आंदोलन करत भाजप नेत्याविरोधात कारवाईची मागणी केली. यावेळी काही अज्ञातांकडून वाहनांची तोडफोड आणि जाळपोळ देखील करण्यात आली. रात्रीपासून सुरू असलेले आंदोलन तब्बल 7 तास चालले आणि पहाटे 5 वाजेपर्यंत दोन फिर्यादी दाखल करण्यात आल्या, तर तिसरी फिर्याद नोंदवण्याचं काम सुरू आहे.
या घटनेनंतर भाजप नेते सुजय विखे पाटील यांनी आपली भूमिका मांडली आहे. “मी जयश्री थोरात यांना ताई म्हणून संबोधलं, त्यामुळे महिलांचा सन्मान होणं गरजेचं आहे, असं सुजय विखेंनी म्हटलंय. तसेच,आमच्या गाड्या ज्यांनी जाळल्या त्यांच्यावर कारवाई व्हावी, अशी मागणी देखील सुजय विखे पाटील यांनी केली.
काँग्रेस नेत्या दुर्गाताई तांबे यांनी भाजप नेत्याच्या आक्षेपार्ह वक्तव्याचा तीव्र शब्दांत निषेध केला. “एकीकडे भाजप सरकार लाडकी बहीण योजना आणतं, तर दुसरीकडे महिलांविषयी असे अपशब्द वापरायचे,”असा तीव्र निषेध व्यक्त केला आहे.
संगमनेरमधील राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं आहे.संगमनेरमधील या राजकीय संघर्षाने विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर वातावरण अधिकच चिघळले आहे.
Jayashree Thorat
![whatsapp link](https://maharashtrajanbhumi.in/wp-content/uploads/2024/03/whatsapp.gif)
![google news gif](https://maharashtrajanbhumi.in/wp-content/uploads/2024/03/google-news-GIF.gif)
हेही वाचा :
लाडक्या बहीणींना डिसेंबरचा हप्ता कधी मिळणार? वाचा सविस्तर
पुण्यात सोन्याने भरलेला ट्रक सापडला, सर्वत्र एकच खळबळ
मविआतील बड्या नेत्यांविरोधात अजित पवारांचा मोठा डाव
अजित पवार गटाची दुसरी यादी जाहीर, झिशान सिद्दीकींनाही मिळालं तिकीट
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर; मोठ्या शक्तिप्रदर्शनासह, दिग्गज नेत्यांचे अर्ज दाखल
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर; महाविकास आघाडीचा मोठा प्लॅन
दाना’ चक्रीवादळाचा धडाका ; 56 पथके हाय अलर्टवर, महाराष्ट्रात काय परिणाम?
पिंपरी चिंचवडमध्ये दुर्दैवी दुर्घटना ; तीन मजुरांचा जागीच मृत्यू
इंदापूरमध्ये राष्ट्रवादीचे दोन गट आमने-सामने?
अजित पवार गटाची यादी जाहीर, वाचा कुणा कुणाला मिळाली संधी
दाना चक्रीवादळ आज धडकण्याची शक्यता, महाराष्ट्रावर होणार का परिणाम?
मनसेची दुसरी उमेदवारी यादी जाहीर; राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात
शिवसेना शिंदे गटाची पहिली यादी जाहीर; मुख्यमंत्री शिंदेंसह अनेक उमेदवारांची नावे घोषित
भाजपची पहिली उमेदवार यादी जाहीर – 99 जागांसाठी उमेदवारांची नावे घोषित