Monday, June 16, 2025
---Advertisement---
---Advertisement---

हायवेवर कार थांबून भाजप नेत्याचे महिले सोबत शारिरीक संबंध, व्हिडिओ व्हायरल

Manoharlal Dhakad Video viral : मध्य प्रदेशातील मंदसौर जिल्ह्यातील एका भाजपा नेत्याचा दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवेवर एका महिलेसोबत आपत्तिजनक अवस्थेत दिसणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रकरणाने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. तर पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

---Advertisement---

मिळालेल्या माहितीनुसार, 13 मे 2025 रोजी रात्री दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवेवर (8-लेन) भानपुरा थाना क्षेत्रात कथितरीत्या हा व्हिडिओ सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. व्हिडिओमध्ये मनोहरलाल धाकड एका महिलेसोबत एका पांढऱ्या रंगाच्या कारमधून (रजिस्ट्रेशन नंबर MP-14-CC-4782) बाहेर येताना आणि आपत्तिजनक अवस्थेत दिसत आहेत. परिवहन विभागाच्या नोंदीनुसार, ही कार मनोहरलाल धाकड यांच्या नावावर नोंदणीकृत आहे. व्हिडिओ इतका आक्षेपार्ह आहे की, तो सार्वजनिकरित्या दाखवणे अशक्य आहे.    (हेही वाचा : पत्रकार अर्णब गोस्वामी आणि भाजप आयटी सेल प्रमुख अमित मालवीय यांच्या विरोधात कॉंग्रेसकडून गुन्हा दाखल)

पोलिसांकडून गुन्हा दाखल

---Advertisement---

व्हायरल व्हिडिओच्या संदर्भात भानपुरा थाना पोलिसांनी तात्काळ कारवाई केली. मंदसौरचे पोलीस अधीक्षक (SP) अभिषेक आनंद यांनी सांगितले की, हा व्हिडिओ दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवेवर भानपुरा थाना क्षेत्रात 13 मे रोजी रेकॉर्ड झाल्याचे तपासात आढळले आहे. पोलिसांनी मनोहरलाल धाकड आणि एका अन्य व्यक्तीविरुद्ध भारतीय नवीन संहितेच्या (BNS) कलम 296 (अश्लील कृत्य), 285 (निष्काळजीपणा) आणि 3(5) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.   (हेही वाचा : शासकीय विश्रामगृहात कोट्यवधी रुपयांची रक्कम सापडल्याने खळबळ)

भाजपने मनोहरलाल धाकड यांच्यापासून अंतर राखले

भाजपाने या प्रकरणात मनोहरलाल धाकड यांच्यापासून अंतर राखले आहे. मंदसौरचे भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश दीक्षित यांनी स्पष्ट केले की, “मनोहरलाल धाकड हे पक्षाचे प्राथमिक सदस्य नाहीत. ते ऑनलाइन माध्यमातून पक्षाचे सदस्य असतील, तर त्याबाबत माहिती नाही.” त्यांनी पुढे सांगितले की, पक्ष अशा कृत्यांना बिलकुल सहन करणार नाही आणि व्हिडिओच्या सत्यतेची चौकशी करून आवश्यक कारवाई केली जाईल.   (हेही वाचा : कल्याणमध्ये इमारतीचा स्लॅब कोसळून 6 जणांचा मृत्यू, 6 जखमी)

धाकड महासभेची कारवाई

मनोहरलाल धाकड हे उज्जैन येथे नोंदणीकृत धाकड महासभेचे राष्ट्रीय मंत्री होते. व्हायरल व्हिडिओनंतर धाकड महासभा युवा संघाने राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अर्जुन धाकड यांच्या निर्देशानुसार मनोहरलाल धाकड यांना राष्ट्रीय मंत्रीपदावरून तात्काळ कार्यमुक्त केले. महासभेने एका निवेदनात याची पुष्टी केली आहे. (हेही वाचा : ‘ईडीने सर्व मर्यादा ओलांडल्या’ सर्वोच्च न्यायालयाचा ईडीवर संताप)

कोण आहेत मनोहरलाल धाकड | Manoharlal Dhakad Video viral

मनोहरलाल धाकड हे मंदसौर जिल्ह्यातील बनी गावचे रहिवासी आहेत. त्यांच्या पत्नी, सोहन बाई, या मंदसौर जिला पंचायतच्या वार्ड क्रमांक 8 मधून भाजपा समर्थित निवडून आलेल्या सदस्य आहेत. धाकड यांचे नाव आधीपासूनच स्थानिक राजकारणात चर्चेत होते, परंतु या प्रकरणाने त्यांची प्रतिमा डागाळली आहे.  (हेही वाचा : सलमान खानच्या घरात घुसण्याचा प्रयत्न करणाऱ्या महिलेला अटक)

WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles