Wednesday, February 5, 2025

छगन भुजबळ यांची कोट्यवधींची बेहिशोबी मालमत्ता प्राप्तिकर विभागाकडून जप्त केल्याचा भाजप नेत्याचा दावा

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अन्न पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची तब्बल १०० कोटी रुपयांची बेहिशोबी मालमत्ता प्राप्तिकर विभागाकडून जप्त केल्याचा दावा भाजपा नेते किरिट सोमय्या यांनी केल्याने खळबळ उडाली आहे.

मंगळवारी दिवसभरातील नारायण राणे यांच्या अटकेच्या नाट्यानंतर किरीट सोमय्या यांनी आज सकाळीच छगन भुजबळ, माजी खासदार समीर भुजबळ आणि पंकज भुजबळ यांची १०० कोटींची मालमत्ता आयकर विभागाने जप्त केल्याचे ट्विट केले आहे.

मात्र, अद्याप या प्रकरणावर मंत्री छगन भुजबळ यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

Related Articles

- Advertisement -

Latest Articles