Friday, November 22, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडPCMC:आगामी लोकसभा निवडणुकीतही भाजपाच ‘अजेय’-भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांचा विश्वास

PCMC:आगामी लोकसभा निवडणुकीतही भाजपाच ‘अजेय’-भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांचा विश्वास

वॉरिअर्स बैठकीत महाविजयाचा केला संकल्प

पिंपरी चिंचवड/क्रांतिकुमार कडुलकर:भारतीय जनता पार्टी ही जगातील सर्वात अनुशासित असणारा राजकीय पक्ष असून, कोणत्याही निवडणुकीसाठी आम्ही सदैव तयार असतो. आगामी लोकसभेच्या निवडणुकीमध्येही भारतीय जनता पक्ष पूर्ण तयारीनिशी उतरणार असून, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतील. त्यासाठी तळागाळातील लोकांपर्यंत पक्षाचा विचार आणि कल्याणकारी योजना पोहोचवण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीतही भाजपा ‘अजेय’ राहील, असा विश्वास शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी व्यक्त केला.

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मावळ लोकसभा अंतर्गत भारतीय जनता पार्टीच्या वतीने वॉरिअर्स बैठक रहाटणी येथील थोपटे लॉन्स या ठिकाणी झाली. यावेळी पिंपरी आणि चिंचवड या दोन विधानसभा क्षेत्रातील वॉरिअर्सशी संवाद साधण्यात आल

या बैठकीला प्रदेश महासचिव विक्रांत पाटील, प्रदेश उपाध्यक्ष अमर साबळे, बाळाभाऊ भेगडे, लोकसभा निवडणूक प्रमुख तथा आमदार प्रशांत ठाकूर, प्रदेश सचिव वर्षा डहाळे, रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य सदाशिव खाडे, बाळासाहेब पाटील, राजेश पिल्ले, युवा मोर्च्याचे प्रदेश महामंत्री अनुप मोरे, चिंचवडच्या आमदार अश्विनी जगताप, भोसरीचे आमदार महेश लांडगे, विधान परिषदेच्या आमदार उमा खापरे, माजी महापौर माई ढोरे, पिंपरी विधानसभा निवडणूक प्रमुख अमित गोरखे, चिंचवड विधानसभा निवडणूक प्रमुख काळूराम बारणे, मावळ विधानसभा निवडणूक प्रमुख रवींद्र भेगडे, शहर वरिष्ठ उपाध्यक्ष तथा प्रवक्ते राजू दुर्गे, उपाध्यक्ष माऊली थोरात, शहर सरचिटणीस विलास मडीगेरी, नामदेव ढाके, शैला मोळक, संजय मंगोडेकर, अजय पाताडे, शीतल शिंदे, युवा मोर्च्याचे शहराध्यक्ष तुषार हिंगे, महिला मोर्च्याच्या अध्यक्षा सुजाता पालांडे, भाजपा कार्यकारिणी सदस्य संतोष कलाटे आदी उपस्थित होते.

शहराध्यक्ष शंकर जगताप म्हणाले की, केंद्र सरकार आणि राज्य शासनाच्या योजना जास्तीत-जास्त नागरिकांपर्यंत कशा प्रकारे पोहचविता येतील? समाजातील शेवटच्या घटकालाही या योजनांचा लाभ कशा प्रकारे मिळू शकेल? यासाठी प्रयत्न करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला. त्यामुळे ‘‘अजेय भारत… अजेय भाजपा..’’ याचा अनुभव पुन्हा एकदा येईल, असा विश्वासही जगताप यांनी व्यक्त केला.

लोकसभेच्या महाविजयासाठी यंत्रणा सक्षम करण्यात आली आहे.

समाजातील सर्व घटकांतील नागरिकांना केंद्र सरकार आणि राज्य शासनाच्या सर्व योजनांचा लाभ मिळावा. या उद्देश्याने सध्या विकसित भारत संकल्प यात्रेचे आयोजन केले आहे. या यात्रेच्या माध्यमातून जास्तीत-जास्त नागरिकांना या योजनांमध्ये सहभागी करून घेण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. त्याअनुरूप कार्य करण्याच्या उद्देश्याने आजच्या बैठकीचे आयोजन केले होते. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली आणि स्थानिक नेत्यांच्या नेतृत्त्वात आम्ही ‘युवा वॉरिअर्स’ना केंद्र व राज्यातील महायुती सरकारच्या योजना, विकासकामे घराघरांत पोहोचवण्याचा संकल्प केला आहे. त्यासाठी शक्तिकेंद्र, बूथप्रमुख आणि पन्ना प्रमुख अशी यंत्रणा सक्षम करण्यात आली आहे.

  • शंकर जगताप, शहराध्यक्ष, भाजपा, पिंपरी-चिंचवड.
संबंधित लेख

लोकप्रिय