Thursday, April 25, 2024
Homeराजकारणभाजप आणि शिंदे गटाला महाराष्ट्रात केवळ ७ जागा जिंकता येणार

भाजप आणि शिंदे गटाला महाराष्ट्रात केवळ ७ जागा जिंकता येणार

मुंबई : आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभुमीवर सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केेली आहे. महाविकास आघाडी मध्ये जागा वाटपावर काम सुरू असल्याचीही चर्चा आहे. नुकताच काही दिवसांपुर्वी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी मुंबई दौरा केला होता. त्यावेळी मुख्यमं६ी एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात जागा वाटपावर चर्चा झाल्याचीही माहिती आहे. अशात ठाकरे गटाचे नेत्याने मोठा गौप्य स्फोट केला आहे.

ठाकरे गटाचे नेते आमदार भास्कर जाधव यांनी एका सर्वेक्षणाचा दाखला देत शिंदे गट आणि भाजपचा पराभव होणार असल्याचे म्हटले आहे. माध्यमांशी बोलताना जाधव म्हणाले, “भाजपने एक ताजं सर्वेक्षण केलेलं आहे. त्या सर्वेक्षणाचा गोपनीय अहवाल माझ्याकडे आलेला आहे. त्यानुसार, महाविकास आघाडीविरुद्ध भाजप आणि शिंदे गटाला महाराष्ट्रात केवळ ७ जागा जिंकता येणार आहेत, त्याही अतिशय कमी मार्जिनने येमार असल्याचे म्हटले आहे.

दरम्यान, दुसऱ्या एका गोपनीय अहवालानुसार भाजप विधानसभेच्या जागा शिंदे गटाला सोबत न घेता लढणार आहे, असा गौप्यस्फोट आमदार भास्कर जाधव यांनी केला आहे.

 हे ही वाचा :

आंदोलक कुस्तीपटूंना केंद्रीय गृहमंत्र्यांचे आश्वासन; अमित शहांनी केली “ही” विनंती..

निलंबित पोलिस निरीक्षक राजेश खांडवे याला अटक

पुण्यात 11वी LGBTQ अभिमान पदयात्रा यशस्वीरित्या संपन्न

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शशिकांत शिंदे यांचे बंधू ऋषिकांत शिंदे यांचा शिंदे गटात प्रवेश

महाराष्ट्रातील 9 रेल्वे उड्डाणपुलांचे लोकार्पण आणि 11 उड्डाणपूल, भुयारी मार्गांचे भूमिपूजन

अक्षय भालेराव या तरूणाचा जातीयवादी सनातनी विचारांच्या गुंडांनी केलेला खून – प्रकाश आंबेडकर

PMC : पुणे महानगरपालिका अंतर्गत विविध पदांची भरती

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय