Thursday, January 16, 2025
HomeNewsबिरसा फायटर्सने वाचविला मुलीचा जीव

बिरसा फायटर्सने वाचविला मुलीचा जीव

रत्नागिरी : मध्यप्रदेश मधील रतलाम येथे एका गरीब आदिवासी लहान मुलीस हाॅस्पिटलमध्ये उपचार करताना रक्ताची अत्यंत आवश्यकता होती. ही गोष्ट गणेश खर्डे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख नंदुरबार बिरसा फायटर्स तथा मुळ गणोर तालुका शहादा जिल्हा नंदुरबार यांना समजली. त्यांनी कुठल्याही प्रकारचा विलंब न करता त्या गरीब मुलीच्या उपचारासाठी रतलाम येथील हाॅस्पिटलमध्ये जाऊन रक्तदान केले. गणेश खर्डे यांनी दिलेल्या रक्तामुळे त्या गरीब मुलीचे जीव वाचण्यास मदत झाली आहे. 

रक्तदान हे जीवनदान म्हटले जाते. त्याची प्रचिती आज एका प्रसंगातून लोकांना पाहायला मिळाली आहे. याच आठवड्यात शिरपूर जिल्हा धुळे  येथील बिरसा फायटर्स टिमने 27 जणांनी लोकमत समूहसोबत लौकी येथील शासकीय आश्रमशाळेत सार्वजनिक रक्तदान केले होते. त्याचे सर्वत्र कौतुक  होत असतानाच पुन्हा एका बिरसा फायटर्स पदाधिकारीने रक्तदान करून समाजासमोर एक आदर्श निर्माण केला आहे. गणेश खर्डे यांनी रक्तदान करून लहान मुलीचे जीव वाचवल्याबद्धल त्यांचे सगळीकडून कौतुक होत आहे. 


संबंधित लेख

लोकप्रिय