Friday, April 19, 2024
Homeग्रामीणएका आठवड्यात शाखांची शंभरी पार करणारी बिरसा फायटर्स ही महाराष्ट्रातली पहिली आदिवासी...

एका आठवड्यात शाखांची शंभरी पार करणारी बिरसा फायटर्स ही महाराष्ट्रातली पहिली आदिवासी संघटना

रत्नागिरी : सुशीलकुमार पावरा संस्थापक बिरसा फायटर्स यांनी लढाऊ बांधवांना एकत्र करून बिरसा फायटर्स ही एक आदिवासी सामाजिक संघटना याच आठवड्यात तयार केली व लगेच बिरसा फायटर्स कार्यकर्ते यांनी जोमाने कामाला सुरुवात केल्यामुळे बिरसा फायटर्स संघटनेने शाखांची शंभरी पार केली आहे. रास्तापूर येथे दिनांक 29 जून 2021 रोजी बिरसा फायटर्सची नवीन गाव शाखा तयार करण्यात आली आहे,त्यामुळे बिरसा फायटर्सच्या आता एकूण शाखा 103 झाल्या आहेत, अशी माहिती संस्थापक बिरसा फायटर्स सुशीलकुमार पावरा यांनी दिली आहे. यासाठी सुशीलकुमार पावरा यांनी बिरसा फायटर्सच्या सर्व कार्यकर्ते यांचे अभिनंदन केले आहे. 

दिनांक 29 जून 2021 रोजी रस्तापूर तालुका राहाता जिल्हा अहमदनगर येथे बिरसा फायटर्सचा नवीन  गाव शाखा तयार करण्यात आली. सुशीलकुमार पावरा संस्थापक बिरसा फायटर्स यांच्या मार्गदर्शनाखाली व ज्ञानेश्वर बर्डे राज्य संघटक बिरसा फायटर्स यांच्या अध्यक्षतेखाली सभा घेऊन शाखा गठित करण्यात आली. 

अंदाजे 500 ते 600 आदिवासी बांधव गाव शाखेत असतील असा अंदाज आहे. त्यामुळे बिरसा फायटर्सची महाराष्ट्रातली सर्वांत मोठी गाव शाखा म्हणून या गाव शाखेची विशेष ओळख राहील. 

गाव शाखेतील आदिवासी बांधवांनी बिरसा फायटर्स वर विश्वास दाखवून स्वयंस्फूर्तीने गाव शाखा तयार केल्याबद्दल  पदाधिकारी व सर्व आदिवासी बंधू भगिनींचे सुशीलकुमार पावरा यांनी  खूप खूप अभिनंदन करत आभार मानले आहेत. 

सभेत भिमा साळुंखे, रविंद्र गायकवाड, ज्ञानेश्वर बर्डे, भानूदास मोरे, वसंत जगताप, अंबादास खुरसणे, श्रावण मोरे, शंकर माळी, भागवत माळी, गोरख पवार, पोपट पवार, श्रावण बर्डे, सुभाष खुरसणे, पोपट माळी, ञ्यंबक खुरसणे, बालासो खुरसणे, विमल रजपूत, संगीता माळी, इंदूबाई मोरे, अशोक रजपूत, पोपट खुरसणे, संतोष मोरे, मिना माळी, सुनिल साळुंखे, अनिल साळुंखे, उमाजी पवार इत्यादी रास्तापूर येथील आदिवासी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

रास्तापूर येथील 122 बेघर भिल्ल आदिवासी कुटुंबांना न्याय मिळवून देण्यासाठी बिरसा फायटर्स टिम पूर्ण पणेसज्ज झाली असून शक्य ते प्रयत्न बिरसा फायटर्स टिम करत आहे. 122 आदिवासी भिल्ल कुटुंबाना लवकरच न्याय मिळेल, अशी आशा सुशीलकुमार पावरा यांनी व्यक्त केली आहे. बिरसा फायटर्स मध्ये सर्व कार्यकर्ते उत्साही व लढाऊ वृत्तीचे आहेत. प्रसंगी मोर्चा, आंदोलन व उपोषण करण्यासाठी रस्त्यावर उतरणारे आहेत. आदिवासींच्या न्याय हक्कासाठी शेवटपर्यंत लढू! लढेंगे ! जितेंगे ! जय बिरसा ! जय आदिवासी ! अशी प्रतिक्रिया संस्थापक अध्यक्ष सुशीलकुमार पावरा यांनी दिली आहे.


संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय