Friday, March 29, 2024
Homeग्रामीण९ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन ग्रामपंचायतीत साजरा करण्याची बिरसा ब्रिगेड सह्याद्रीची मागणी

९ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन ग्रामपंचायतीत साजरा करण्याची बिरसा ब्रिगेड सह्याद्रीची मागणी

जुन्नर ९ ऑगस्ट आदिवासी दिवस साजरा करण्याची मागणी बिरसा ब्रिगेड सह्याद्रीच्या वतीने आंबेगव्हाण पाचघर चे पेसा ग्रामकोष समितीकडे करण्यात आली आहे. 

निवेदनात म्हटले आहे की, संपूर्ण जगामध्ये 9 ऑगस्ट रोजी जागतिक आदिवासी दिन साजरा करण्यात येतो. आपले गाव हे राज्य घटनेतील 244 -1 प्रमाणे व 13 -3 (क) प्रमाणे कार्यान्वित होते. ‘माझा गाव, माझ सरकार’ प्रमाणे कार्यान्वित होते. मात्र या कायदयांची अंमलबजावणी करत नाहीत म्हणून आदिवासी हक्क अधिकारापासून वंचीत आहेत. पेसा निधीतून आदिवासी संस्कृती संवर्धनाठी विशेष तरतूद असतानाही काही ठिकाणी याची अंमलबजावणी होतच नाही. पेसा गावातील अधिकार हे सरपंचांपेक्षाही पारंपारिक ग्रामसभा व पेसा अध्यक्षांना आहेत. मात्र पारंपारिक ग्रामसभाची अमलबजावणी होत नाही. ‘ ना लोकसभा, ना राज्यसभा, सबसे उंची ग्रामसभा ‘ म्हणून आपल्या स्तरावर गावात जागतिक आदिवासी दिन साजरा करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

निवेदनावर बिरसा ब्रिगेडचे तालुका अध्यक्ष शिवाजी मडके, शुभम भवारी, शुभम उंडे, पंचायत समिती सदस्य काळू गागरे, बाळासाहेब धराडे, समीर वाजे, जगनाथ वाजे, जालिंदर दुधवड़े, संगीता असवले, बाबू मधे आदींची नावे आहेत.


संबंधित लेख

 


- Advertisment -

लोकप्रिय