Bima Sakhi Yojana : महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या दिशेने मोठे पाऊल टाकत पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या सोमवारी हरियाणातील पानीपत येथे बीमा सखी योजना सुरू करणार आहेत. भारतीय जीवन विमा निगम (LIC) मार्फत राबविण्यात येणाऱ्या या योजनेचा उद्देश ग्रामीण व अर्ध-शहरी भागातील महिलांना आर्थिक स्वावलंबनाकडे नेणे आणि वित्तीय समावेशनाला प्रोत्साहन देणे आहे.
Bima Sakhi Yojana काय आहे?
बीमा सखी योजना 18 ते 70 वयोगटातील, 10वी पास महिलांसाठी तयार करण्यात आली आहे. या योजनेत सहभागी महिलांना तीन वर्षांचे विशेष प्रशिक्षण दिले जाईल. प्रशिक्षण कालावधीदरम्यान महिलांना मासिक वजीफाही प्रदान करण्यात येईल. प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर या महिलांना LIC एजंट म्हणून काम करण्याची संधी मिळेल. स्नातक शिक्षण घेतलेल्या महिलांना LIC मध्ये विकास अधिकारी म्हणूनही काम करण्याची संधी दिली जाईल.
काय मिळणार लाभ
- योजनेअंतर्गत देशभरातील 1 लाख महिलांना LIC एजंट म्हणून तयार केले जाणार आहे.
- पहिल्या वर्षी प्रशिक्षण घेणाऱ्या महिलांना दरमहा 7,000 रुपये वजीफा दिला जाईल.
- दुसऱ्या वर्षी ही रक्कम 6,000 रुपये आणि तिसऱ्या वर्षी 5,000 रुपये असेल.
- याशिवाय, उद्दिष्ट पूर्ण करणाऱ्या महिलांना कमीशन स्वरूपात अतिरिक्त प्रोत्साहन दिले जाईल.
- पहिल्या टप्प्यात 35,000 महिलांना रोजगाराच्या संधी मिळतील, तर पुढील टप्प्यात 50,000 महिलांना लाभ दिला जाईल.
बीमा सखी योजनेचा मुख्य हेतू ग्रामीण व अर्ध-शहरी भागातील महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी करणे आहे. या योजनेतून महिलांना रोजगाराच्या संधी मिळतील, स्थिर उत्पन्नाची हमी मिळेल, आणि LIC च्या माध्यमातून विमा विषयक ज्ञान व वित्तीय साक्षरता यांचा प्रसार होईल.
बीमा सखी योजना रोजगार निर्मितीबरोबरच महिलांच्या सक्षमीकरणासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. महिलांना आता आर्थिक व्यवहारांमध्ये प्रमुख भूमिका निभावण्याची संधी मिळणार असून त्यांचं योगदान देशाच्या आर्थिक विकासात महत्त्वाचं ठरेल.
हे ही वाचा :
Jio च्या ग्राहकांसाठी खूशखबर : 479 रुपयांत 84 दिवसांचा नवा प्लॅन ; वाचा काय आहे ऑफर
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा संक्षिप्त परिचय
95 विधानसभा मतदारसंघात EVM-VVPAT मशिन्सच्या तपासणीसाठी 104 अर्ज प्राप्त
मोठी बातमी : देवेंद्र फडणवीस यांनी घेतली मुख्यमंत्री पदाची शपथ
नेक्स्ट जेनरेशन बजाज चेतक या महिन्यात लाँच होणार, वाचा काय असणार किंमत
जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, मुंबई अंतर्गत मोठी भरती
पुणे येथे विविध पदांसाठी भरती; विनापरीक्षा होणार भरती
पुणे जिल्हा परिषदे अंतर्गत भरती सुरू; आजच अर्ज करा !