(नवी दिल्ली):- चिनी वस्तूंचा सातत्याने विरोध करणारे भाजप आता तोंडघशी पडताना दिसत आहे. चिनी देणग्यावरून कॉग्रेसवर निशाणा साधला जात असतानाच ‘पीएम केअर्स फंड’ला चिनी कंपन्यांकडून मोठी देणगी देण्यात आल्याचे समोर आले आहे. भारत – चीन मध्ये संघर्ष होण्याच्या अगोदर ही मदत आल्याचे वृत ‘नॅशनल हेराल्ड’ने दिल्याचे सकाळने म्हटले आहे.
भारत – चीन संघर्षाच्या पार्श्वभूमीवर चिनी वस्तूंंवर बंदी घालण्याची मागणी होत असतानाच केंद्र सरकारने टिक-टॉक आणि यूसी ब्राऊझर सह 59 चिनी ऍप वर बंदी घातली आहे. अशातच चिनी कंपन्यांनी “पीएम केअर्स फंड”ला 49 कोटींची देणगी दिल्याचे समोर आले आहे.
कोरोनाच्या संकटात ‘टिक-टॉक’ कंपनीने ‘पीएम केअर्स फंड’ला सगळ्यात जास्त ३० कोटींची देणगी दिली आहे. तसेच श्याओमी या चिनी मोबाईल निर्मिती कंपनीने ‘पीएम केअर्स फंड’ला १० करोड़ रुपये दिले आहेत. भारताच्या मोबाईल बाजारात जवळपास 29 टक्के श्याओमीचे वापरकर्ते आहेत.
‘पीएम केअर्स फंड’ला विविध चिनी कंपन्यांनी केलेली मदत पुढीलप्रमाणे :
◆ टीक – टॉक – ३० करोड
◆ श्याओमी- १० करोड
◆ हुआवे – ७ करोड
◆ वन प्लस – १ करोड
◆ ओपो – १ करोड
नेहमी स्वदेशीचा नारा देणारे आणि सातत्याने चीनी वस्तूला विरोध करणारे भाजप ‘पीएम केअर्स फंड’ला दिलेल्या निधीवर गप्प का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. दरम्यान, “पीएम केअर्स फंड” खात्याचे ऑडिट केले जाणार नसल्याची माहिती समोर आली होती.