Monday, July 15, 2024
Homeराष्ट्रीयब्रेकिंग : बिकानेर गुवाहाटी एक्सप्रेसचा अपघात, अनेक लोक जखमी

ब्रेकिंग : बिकानेर गुवाहाटी एक्सप्रेसचा अपघात, अनेक लोक जखमी

Photo Credit : ANI Tweet

जलपाईगुडी : पश्चिम बंगालच्या जलपाईगुडी येथे बिकानेर गुवाहाटी एक्सप्रेस रुळावरून घसरुन अपघात झाला आहे. “बीकानेर एक्सप्रेस” 15633 (up) ही ट्रेन पटनाहून गुवाहाटीला जात होती. या दुर्घटनेत अनेक जण जखमी झाल्याची भीती व्यक्त केली जात असून सध्या बचाव आणि मदतकार्य सुरू आहे. 

एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, मेनागुरीजवळ सायंकाळी ५.०५ वाजता हा अपघात झाला. स्लीपर कोच रुळावरून ४ ते ५ डबे घसरले असुन १५ डब्यांचे नुकसान झाले आहे. प्राथमिक माहितीनुसार या अपघातात १५ लोक जखमी झाले असून 3 लोकांचा मृत्यू झाला आहे. हा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जखमींना जवळच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. स्थानिक लोक देखील जखमींना रेल्वेच्या डब्यातुन बाहेर काढण्यासाठी मदत करत आहेत. 

 

या प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याशी चर्चा केली आहे. या अपघातानंतर रेल्वे प्रशासनाकडून ८१३४०५४९९९ हा नंबर जारी करण्यात आला आहे.

हेही वाचा ! धक्कादायक : जात पाहुन वकिलाला नाकारले घर

हेही वाचा ! आदिवासी, दलित शेतकऱ्यांना अमानुष मारहाण केल्याचा डॉ. अजित नवले यांचा आरोप, …अन्यथा तीव्र आंदोलन

हेही वाचा ! नाशिक चलन नोट प्रेस यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण १४९ जागा

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय