बिहार : बिहार विधानसभा निवडणुका आता अवघ्या काही दिवसांवर निवडणुका येऊन ठेपल्या आहेत. 243 जागांसाठी या निवडणुका होत आहेत. या पार्श्वभूमीवर सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील जेडीयू आणि भाजप यांच्यात जागावाटपामध्ये 50-50 चा फॉर्म्यूला ठरल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, रालोआतील घटकपक्ष अजून संभ्रमात आहेत.
सत्ताधारी नितीश कुमार यांचा जेडीयू पक्ष हा 122 तर दुसऱ्या बाजूला भाजप 121 जागांवर निवडणुका लढणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. अशा परिस्थिती घटक पक्षांना किती जागा दिल्या जाणार आहे या कडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महाआघाडीचा जागा वाटपाचा पेच सुटला आहे. राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेस यांच्यात राजद 144 जागा तर काँग्रेस 70 जागांवर निवडणूक लढवणार आहे. तसेच कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (मार्क्सवाद, लेनिनवादी) 19 तर कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (CPI) 6, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (मार्क्सवादी) (CPIM) 4 जागांवर लढणार आहे. या आघाडीकडून राजदचे नेते आणि माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांच्या मुलाला म्हणजेच तेजस्वी यादव यांना मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार म्हणून घोषित करण्यात आले आहे.