Thursday, March 28, 2024
HomeNewsएअर इंडियामध्ये ५१०० केबिन क्रू-वैमानिकांची मोठी भरती

एअर इंडियामध्ये ५१०० केबिन क्रू-वैमानिकांची मोठी भरती

टाटा समूहाच्या मालकीची एअर इंडिया २०२३ मध्ये एकूण ५१०० नव्या कर्मचाऱ्यांची भरती करणार आहे. या भरती संख्येत, ४२०० हून अधिक केबिन क्रू आणि सुमारे ९०० पायलटची भरती केली जाईल.

एअरलाइन्सने म्हटले आहे की ते त्यांच्या ताफ्यात नवीन विमाने जोडत आहेत आणि त्यांच्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय कामकाजाचा वेगाने विस्तार करत आहेत. म्हणूनच ते केबिन क्रू आणि पायलटची नियुक्ती करत आहेत. (Air India)

एअर इंडियाकडे सध्या ११३ विमानांचा ताफा चालवण्यासाठी सुमारे १६०० वैमानिक आहेत. पूर्वी क्रू कमतरतेमुळे अनेक लांब पल्ल्याच्या उड्डाणे रद्द करावी लागत किंवा त्यांना उशीर व्हायचा. एअर इंडियाच्या इतर दोन सहाय्यक उपकंपन्या एअर इंडिया एक्सप्रेस आणि एअरएशिया इंडियाकडे त्यांची ५४ विमाने उडवण्यासाठी सुमारे ८५० वैमानिक आहेत, तर ज्वाईंट वेंचर एअरलाइन विस्तारा कडे ६०० पेक्षा जास्त पायलट आहेत. (Air India)

फेब्रुवारीच्या सुरुवातीस, एअर इंडियाने त्यांच्या वाढीच्या योजनांना प्रत्यक्षात उतरवत बोईंग आणि एअरबसकडून ४७० विमाने खरेदी करण्याची घोषणा केली. एअरलाइनने आधीच ३६ विमाने भाड्याने घेण्याची घोषणा केली आहे ज्यापैकी दोन B777-200LR विमाने आधीच त्यांच्या ताफ्यात सामील झाली आहेत. (Air India)

एअर इंडिया देशभरातून केबिन क्रूची भरती करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. नव्या कर्मचाऱ्यांना सुरक्षा आणि सेवा कौशल्य प्रदान करणाऱ्या १५ आठवड्यांच्या प्रशिक्षणातून जावे लागणार आहे. या प्रशिक्षणात आदरातिथ्य आणि टाटा समुहाच्या संस्कृतीचे पालन कसे केले जावे हे शिकवले जाणार आहे.

मे २०२२ ते फेब्रुवारी २०२३ दरम्यान, एअर इंडियाने १९०० हून अधिक केबिन क्रूची नियुक्ती केली आहे. गेल्या सात महिन्यांत म्हणजे जुलै २०२२ ते जानेवारी २०२३ मध्ये ११०० हून अधिक केबिन क्रूला प्रशिक्षण देण्यात आले आहे. यासह, गेल्या तीन महिन्यांत, सुमारे ५०० केबिन क्रूला एअरलाइनने उड्डाणासाठी पूर्णपणे तयार केले आहेत.

भरती कार्यक्रमाबद्दल बोलताना इनफ्लाइट सर्व्हिसेसचे प्रमुख संदीप वर्मा म्हणाले की, महिन्याच्या सुरुवातीला मोठ्या विमानांच्या ऑर्डरची घोषणा केल्यामुळे, आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत नेटवर्कवरील फ्लाइट्सची संख्या वाढेल. नवीन भरतीमुळे एअर इंडियामधील सांस्कृतिक बदलाचा वेगही वाढेल. ते म्हणाले की, आम्ही आणखी वैमानिक आणि देखभाल अभियंता नियुक्त करण्याचा विचार करत आहोत.

संबंधित लेख

 


- Advertisment -

लोकप्रिय