पुणे : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ (एस. टी.) ने भाडे वाढीचा प्रस्ताव तयार केला आहे. सर्वसामान्यांचा एस. टी. प्रवास महागणार आहे. डिझेल दरवाढीमुळे एस. टी. वर १४० कोटींचा भार आहे. त्यामुळे हा प्रस्ताव आणला गेल्याचे बोलले जात आहे.
एस. टी. ने २०१८ मध्ये १८ टक्के भाडेवाढ केली होती. परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुन्हा भाडेवाढ करणे भाग पडले आहे. कर्मचाऱ्यांचे पगार आणि डिझेलसाठीही एस. टी. महामंडळाला आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत आहे.
राज्यातील विविध भागात डिझेलच्या कमतरेमुळे कोरोना काळ असतानाही प्रवास सेवा स्थगित केल्याचे सुत्रांकडून समजते. अनेक ग्रामीण भागातील प्रवास सेवा दोन – तीन ते काही ठिकाणे जास्तही कालावधीसाठी स्थगित केल्याचे समजते.