नवी दिल्ली : सूरत न्यायालयाच्या 2 वर्षांच्या शिक्षेला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतर आज (सोमवारी) सकाळी लोकसभा सचिवालयाने राहुल गांधी यांना पुन्हा खासदारकी बहाल केली आहे. याबाबतची अधिसूचनाही लोकसभा सचिवालयाने जारी केली आहे.
मोदी आडनाव बदनामी प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी राहुल गांधी यांची दोन वर्षांची शिक्षा आणि शिक्षा रद्द केली. त्यामुळे त्यांचा संसदेच्या पुनर्स्थापनेचा मार्ग मोकळा झाला.
8 ऑगस्ट..म्हणजे उद्या संसदेत अविश्वास प्रस्तावावर चर्चा होणार आहे. 2014 नंतर मोदी सरकारच्या विरोधातला हा दुसरा अविश्वास प्रस्ताव आहे. खासदारकी मिळाल्यानंतर राहुल गांधी या चर्चेत राहुल गांधी सहभागी होणार आहेत.