Tuesday, January 21, 2025

मोठी बातमी : पिंपरी-चिंचवड महापालिका स्थायी समिती अध्यक्षांना अटक

पिंपरी चिंचवड : पिंपरी-चिंचवड महापालिकेत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने धाड टाकली, स्थायी समिती अध्यक्षांना अटक केली. या कारवाईमुळं महापालिकेत मोठी खळबळ उडाली आहे.

स्थायी समितीत कोट्यवधी रुपयांची विकासकामं मंजूर केली जातात. ही कामं मंजूर करताना मोठा गैरव्यवहार होतो अशी चर्चा आहे. एका ठेकेदाराला काम देण्याच्या बदल्यात 9 लाख रुपयांची मागणी करण्यात आली होती, यातील 2 लाख रुपये स्वीय सहाय्यक ज्ञानेश्वर पिंगळे स्विकारत असताना एसबीने त्यांना रंगेहाथ पकडलं. त्यानंतर स्थायी समिती अध्यक्ष नितीन लांडगे आणि इतरांची चौकशी करण्यात आली.

यानंतर स्थायी समिती अध्यक्ष नितीन लांडगे स्वीय सहाय्यक ज्ञानेश्वर पिंगळे, लिपिक विजय चावरीया, कॉम्प्युटर ऑपरेटर राजेंद्र शिंदे आणि शिपाई अरविंद कांबळे यांना एसीबीकडून अटक करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. या सर्वांना आता पुण्याच्या दिशेनं नेण्यात आलं आहे.

– संपादन : रफिक शेख 


Related Articles

- Advertisement -

Latest Articles