Friday, March 14, 2025

मोठी बातमी: अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेच्या तारखा जाहीर

WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

सोलापूर : राज्यातील अंतिम वर्षाची परिक्षा १ ऑक्टोबर ते १५ ऑक्टोबर २०२० रोजी होण्याची शक्यता असून सुधारित वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येईल असे ट्विट उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केले आहे.

सामंत यांनी ट्विट केले आहे की, “उच्च व तंत्रशिक्षण विभाग सीईटी सेल मार्फत विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी राज्य सामायिक प्रवेश परीक्षा (एमएचटी-सीईटी) दिनांक १ ऑक्टोबर ते १५ ऑक्टोबर २०२० दरम्यान घेण्याचा प्रयत्न आहे. याचे सुधारित वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येईल. विद्यार्थ्यांनी आपला अभ्यास चालू ठेवावा.”

राज्यातील 13 अकृषिक विद्यापीठांशी संलग्नित साडेपाच हजार महाविद्यालयांतील सुमारे साडेसात लाख विद्यार्थ्यांपैकी चार ते पाच लाख विद्यार्थ्यांकडे ऑनलाईनची साधने उपलब्ध आहेत . त्यांची घरबसल्या ऑनलाइन तर ज्यांच्याकडे ऑनलाईनची साधने नाहीत, त्यांची ऑफलाइन परीक्षा घेण्याचे नियोजन झाले आहे. सर्व विद्यार्थ्यांना बहुपर्यायी प्रश्नपत्रिका दिली जाण्याची शक्यता आहे. 

आज सकाळी ११ :३० वाजता उच्च व तंत्रशिक्षण मंत्री सामंत, राज्यमंत्री तनपुरे, ए. सी. एस. जलोटा यांनी अंतिम वर्षाच्या परिक्षांबाबत राज्यपालांसमवेत चर्चा केली. परीक्षा सोप्या पध्दतीने व्हाव्या अशी अपेक्षा राज्यपालांनी व्यक्त केल्याचे ट्विट सामंत यांनी केले आहे.

विद्यापीठांच्या वेबसाईटवरही वेळापत्रक जाहीर केले जाणार आहे. घरबसल्या परीक्षा घेतली जाणार असली, तरीही त्यांना परीक्षा क्रमांकानुसारच परीक्षा द्यावी लागणार आहे. जेणेकरुन निकालास विलंब लागणार नाही तथा अडचणी येणार नाहीत. दरम्यान, विद्यार्थ्यांना बहुपर्यायी उत्तरपत्रिका दिल्या जाणार आहेत.


Related Articles

- Advertisement -

Latest Articles