Tuesday, April 29, 2025
---Advertisement---
---Advertisement---

मोठी बातमी : मोबाईल निर्माता कंपनी Xiaomi वर ईडीची मोठी कारवाई, 5 हजार 551 कोटींची मालमत्ता जप्त

---Advertisement---

Ed Action Against Xiaomi : अंमलबजावणी संचालनालयाने (ED) मोबाईल निर्माता कंपनी Xiaomi विरोधात मोठी कारवाई केली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, केंद्रीय एजन्सी ईडीने परकीय चलन व्यवस्थापन कायदा, 1999 च्या तरतुदींचे उल्लंघन केल्याप्रकरणी शाओमी टेक्नॉलॉजी इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे ​​5551.27 कोटी रुपये जप्त केले आहेत. Xiaomi India ही चीनमधील Xiaomi समूहाची पूर्ण मालकीची उपकंपनी आहे. 

Xiaomi इंडिया कंपनीने देशाबाहेर बेकायदेशीरपणे पैसे पाठवल्याच्या आरोपासंदर्भात ईडीने या वर्षी फेब्रुवारी महिन्यात चौकशी सुरू केली होती.

ईडीचे म्हणणे आहे की Xiaomi इंडिया कंपनीने 2014 मध्ये भारतात आपले कामकाज सुरू केले आणि 2015 मध्ये पैसे बाहेर पाठवण्यास सुरुवात केली. ईडीने सांगितले की त्यांनी आतापर्यंत परदेशातील तीन संस्थांना 5,551.27 कोटी रुपयांचे परकीय चलन पाठवले आहे. जे परकीय चलन व्यवस्थापन कायदा (FEMA) च्या कलम 4 चे उल्लंघन आहे. परदेशात पैसे पाठवतानाही कंपनीने बँकांना दिशाभूल करणारी माहिती दिल्याचा आरोप आहे.

ब्रेकिंग : बॉलिवूडच्या “या” प्रसिद्ध अभिनेत्रीवर ईडीची मोठी कारवाई, ७ कोटी २७ लाखांची मालमत्ता जप्‍त

मोठी बातमी : राज ठाकरे यांच्या ताफ्याचा अपघात, 3 ते 4 गाड्या एकमेकांवर आदळल्या

मेगा भरती : एअर इंडिया एअर सर्विसेस लिमिटेड मध्ये 862 जागांसाठी भरती, मुलाखतीद्वारे होणार निवड !


WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles