ChatGPT Outage Down : जगभरातील लाखो लोकांच्या दैनंदिन जीवनाचा भाग बनलेले AI-आधारित चॅटबॉट ChatGPT गुरुवारी अचानक बंद पडले. यामुळे युजर्सना मोठी अडचण निर्माण झाली. त्यामुळे जगभरातील युजर्स या प्लॅटफॉर्मचा वापर करू शकले नाहीत.
ChatGPT Down, युजर्स हैराण
सोशल मीडियावर युजर्सनी आपली नाराजी आणि अस्वस्थता व्यक्त केली. या अचानक बंद पडण्यामुळे अनेक युजर्स जे आपल्या कामासाठी, अभ्यासासाठी किंवा इतर कामांसाठी चॅट जीपीटी वर अवलंबून होते, त्यांना मोठ्या अडचणीला सामोरे जावे लागले. यानंतर काही वेळातच सोशल मीडियावर एक्सवर ChatGPT Down हा शब्द ट्रेन्डवर आला. चॅट जीपीटी डाऊन होण्याची ही 2 महिन्यातील चौथी घटना आहे.
एका युजरने X (पूर्वी ट्विटर) वर लिहिले, “विश्वास नाही होत आहे की चॅट जीपीटी बंद पडले आहे! मी एक प्रोजेक्टच्या मध्यभागी होतो आणि आता मी अडकलो आहे.”
OpenAI ने अजूनही या बंद पडण्याचे कारण स्पष्ट केलेले नाही. या प्लॅटफॉर्मच्या बंद पडण्यामुळे अनेक महत्त्वाच्या कामांवर परिणाम झाला आहे. OpenAI ही समस्या किती लवकर सोडवते हे पाहणे महत्त्वाचे आहे.
काय काम करते चॅट जीपीटी ?
चॅट जीपीटी हे विद्यार्थी, संशोधक किंवा इतर व्यावसायिक अशा प्रत्येक वर्गाला उपयोगी पडणारे एक अतिशय लोकप्रिय AI-आधारित चॅटबॉट आहे. क्रिएटिव्ह रायटिंग, कंटेंट तयार करणे आणि इतर अनेक प्रकारचे काम ChatGPTच्या मदतीने केले जात होते. अचानक चॅट जीपीटी बंद पडल्याने युजर्सला मोठी अडचण निर्माण झाली.
हे ही वाचा :
थायलंडमध्ये समलैंगिक विवाहाला कायदेशीर मान्यता, आशियामधील ठरला तिसरा देश
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात ; वृद्ध महिलेचा मृत्यू, सहा जण जखमी
पहिल्या टी-20 सामन्यात भारताचा इंग्लंडवर 7 विकेट्सने दणदणीत विजय
मोठी बातमी : कपिल शर्मासह ‘या’ बॉलीवूड कलाकारांना जीवे मारण्याची धमकी, बॉलीवूडमध्ये खळबळ
‘बर्ड फ्लू’मुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मिळणार नुकसान भरपाई
मुलीचा HIV ने मृत्यू झाल्याची अफवा, गावकऱ्यांची कुटुंबावर बहिष्काराची धक्कादायक घटना
लग्नाचे आमिष दाखवून डॉक्टर तरुणीची 10 लाखांची फसवणूक, मानसिक धक्क्यातून केली आत्महत्या
स्टाफ रूममधील शिक्षक-शिक्षिकेचा अश्लील व्हिडिओ व्हायरल, संबंधित शिक्षक निलंबित