Tuesday, April 1, 2025
---Advertisement---
---Advertisement---

ED against Rohit Pawar : रोहित पवार यांच्यावर ईडीची मोठी कारवाई

Rohit Pawar News : शरद पवार गटाचे नेते रोहित पवार यांच्यावर ईडीने मोठी कारवाई केली आहे. (ED against Rohit Pawar) आमदार रोहित पवार यांच्या बारामती ॲग्रो लि. कारखान्यावर काही दिवसांपूर्वी ईडीने धाड टाकून चौकशी केली होती. आज मात्र ईडीने पवारांच्या बारामती अॅग्रोच्या (Baramati Agro) संबंधित संपत्ती जप्त करण्यात आली आहे. या कारवाईचा राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाला मोठा धक्का मानला जात आहे. ED action against Rohit Pawar

---Advertisement---

राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांना ईडीने या अगोदरही चौकशीसाठी बोलावले होते. तसेच काही दिवसांपुर्वी कंपनीवर कारवाई देखील केली होती. आज पुन्हा ईडीने बारामती अॅग्रो (Baramati Agro) या कंपनीने खरेदी केलेल्या कन्नड सहकारी साखर कारखान्याची मालमत्ता ईडीने जप्त केली आहे. ईडीने मनी लाँड्रिंग प्रकरणात ही कारवाई केली.

ईडीने बारामती अॅग्रो प्रायव्हेट लिमिटेड सोबतच, कन्नड एसएसके औरंगाबाद या बंद साखर कारखान्याच्या खरेदीच्या संबंधाने १ फेब्रुवारी रोजी चौकशी केली होती. रोहित पवार यांची तब्बल 11 तास चौकशी झाली होती. आता छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील कन्नड सहकारी साखर कारखाना ईडीने जप्त केला आहे.

---Advertisement---

कारखान्याची १६१ एकर जमीन ईडीने जप्त केल्याची माहिती आहे. जवळपास ५०.२० कोटी रुपयांची मालमत्ता या कारवाईत जप्त करण्यात आलेली आहे.

whatsapp link

हे ही वाचा :

मोठी बातमी : मराठा आरक्षणा संदर्भात राज्य सरकारला न्यायालयाचे महत्वाचे निर्देश

हो मला आदित्यला मुख्यमंत्री करायचंय… उद्धव ठाकरे यांचे मोठे विधान

घरगुती गॅस च्या किंमती तब्बल इतक्या रुपयांनी होणार कमी

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे विविध उपक्रम

उद्धव ठाकरे यांच्याकडून नितीन गडकरी यांना मोठी ऑफर

WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles