चिखली (पुणे) : वडाचा मळा जाधववाडी येथे राहुल दादा स्पोर्ट्स फौंडेशनच्या वतीने बांधण्यात येणाऱ्या दत्तमंदिराच्या भूमी पूजनाचा कार्यक्रम संपन्न झाला.
माजी महापौर आणि विद्यमान नगरसेवक राहुल जाधव यांनी जागेवर भूमी पूजन केले. जाधववाडी चिखली या परिसरात हजारो दत्तभक्त आहेत. आज श्री. दत्त जयंती निमित्ताने श्री. गुरुदेव दत्त मंदिराचे पाया पूजन करण्यात आले.
या वेळी माजी महापौर राहुल जाधव आणि उद्योजक गोरखशेठ जाधव, जालिंदर जाधव, विनायक जाधव आदी सहपरिवारासह उपस्थित होते.